Eiffel Tower Dainik Gomantak
ग्लोबल

Eiffel Tower Bomb Threat: आयफेल टॉवरमध्ये बॉम्ब? धमकीनंतर परिसरात खळबळ; पोलिस घटनास्थळी

Manish Jadhav

Tower Bomb threat: आयफेल टॉवरमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आयफेल टॉवर संकुल रिकामे केले आहे.

तसेच, आयफेल टॉवर पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. फ्रेंच पोलिस सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

आयफेल टॉवरमध्ये बॉम्ब?

फ्रान्स पोलिस सूत्रांनी सांगितले की, पॅरिसच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आयफेल टॉवरचे तीन मजले खाली करण्यात आले येत आहे. पोलिसांच्या अनेक तुकड्याही घटनास्थळी तैनात आहेत. आयफेल टॉवरच्या आजूबाजूलाही बॉम्बचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी (Police) या ऐतिहासिक वास्तूभोवती बॅरिकेडिंगही केले आहे. तसेच, खबरदारी म्हणून पर्यटकांना टॉवरपासून दूर राहण्यास सांगितले जात आहे.

आयफेल टॉवरच्या सुरक्षेबद्दल...

आयफेल टॉवरच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, टॉवरच्या साउथ पिलरजवळ एक पोलीस ठाणे आहे. जिथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. संकुलात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांना कडक सुरक्षा निगराणीतून जावे लागते.

आयफेल टॉवरचे बांधकाम जानेवारी 1887 मध्ये सुरु झाले आणि 31 मार्च 1889 रोजी संपले. 1889 च्या जागतिक मेळ्यादरम्यान, दोन दशलक्ष पर्यटकांनी (Tourists) आयफेल टॉवर पाहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT