Oracle Layoffs 2026 Dainik Gomantak
ग्लोबल

Oracle Layoffs 2026: मानवी श्रमावर एआयचा घाला! ओरॅकलनं 21000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; महाकपातीनंतर आयटी क्षेत्रात चिंतेचं वातावरण

Oracle Layoffs 2026 News Updates: अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी 'ओरॅकल' याचे ताजे आणि धक्कादायक उदाहरण म्हणून समोर आली.

Manish Jadhav

Oracle Layoffs 2026 News Updates: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान एकीकडे कंपन्यांची कार्यक्षमता वाढवत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे मात्र ते लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी 'ओरॅकल' याचे ताजे आणि धक्कादायक उदाहरण म्हणून समोर आली. कंपनीने आर्थिक वर्ष 2026 दरम्यान जगभरातील आपल्या सुमारे 21,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. एआय आधारित तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि ऑटोमेशनमुळे येणाऱ्या काळात आणखीही नोकऱ्यांवर गदा येऊ शकते, अशी स्पष्ट कबुली कंपनीने दिली.

ओरॅकलच्या वार्षिक अहवालानुसार, 31 मे 2026 पर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या घटून 1.41 लाख झाली, जी गेल्या वर्षी सुमारे 1.62 लाख इतकी होती. म्हणजेच कंपनीने आपल्या एकूण कर्मचारी वर्गात तब्बल 13 टक्क्यांची कपात केली. एआय तंत्रज्ञानामुळे कामे ऑटोमेटेड होत असून कर्मचाऱ्यांची (Employees) गरज कमी भासत असल्याचे कंपनीने म्हटले. याशिवाय व्यवस्थापनातील बदल, नवीन उत्पादनांची निर्मिती आणि धोरणात्मक पुनर्रचना ही देखील या कर्मचारी कपातीची मुख्य कारणे आहेत.

सध्या ओरॅकलचे चेअरमन लॅरी एलिसन यांच्या नेतृत्वाखाली कंपनी क्लाउड कॉम्प्युटिंग आणि एआय क्षेत्रात वेगाने विस्तार करत आहे. कंपनी 'OpenAI' सारख्या बड्या ग्राहकांसाठी अवाढव्य एआय डेटा सेंटर्स उभारत असून, या माध्यमातून ती थेट ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गजांना आव्हान देत आहे. चालू आर्थिक वर्षात ओरॅकल या एआय विस्तारासाठी तब्बल 70 अब्ज डॉलर्सचे भांडवल गुंतवणार असून, त्यासाठी 40 अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज आणि इक्विटी उभारण्याची तयारी सुरु आहे. मात्र, एआयची ही शर्यत कंपनीसाठी खर्चिक ठरत आहे, कारण कर्मचारी कपात आणि पुनर्रचनेवरच कंपनीला 1.84 अब्ज डॉलर्स खर्च करावे लागले आहेत.

ओरॅकलने आपल्या अहवालात कर्मचाऱ्यांना आणि टेक क्षेत्राला भविष्याविषयी सावध केले. एआयचा वापर जसजसा वाढेल, तसतशी मानवी श्रमाची गरज कमी होऊन भविष्यातही कर्मचारी संख्या घटू शकते, असा इशारा कंपनीने दिला . जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्या ज्या वेगाने एआयचा स्वीकार करत आहेत, ते पाहता आगामी काळात उत्पादकता नक्कीच वाढेल, परंतु लाखो रोजगारांसमोर मोठे संकट निर्माण होण्याची भीती आता खरी ठरताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT