And the exile began... One and a half lakh Afghan refugees left Pakistan in search of shelter. Dainik Gomantak
ग्लोबल

Afghan Refugees: अन् सुरू झाला वनवास... निवाऱ्याच्या शोधात दीड लाख अफगाण निर्वासितांनी सोडला पाकिस्तान

Afghan Refugees In Pakistan: विशेष म्हणजे या इतक्या मोठ्या संख्येमध्ये काहीजण त्यांच्या आयुष्यात प्रथमच अफगाणिस्तानात पाऊल ठेवत आहेत.

Ashutosh Masgaunde

One and a half lakh Afghan refugees left Pakistan in search of shelter:

पाकिस्तानात राहत असलेल्या 1.7 दशलक्ष अफगाण निर्वासितांना देश सोडण्याची सूचना केल्यापासून एका महिन्यात 165,000 हून अधिक अफगाण निर्वासितांनी पाकिस्तानातून पलायन केले आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

बेकायदेशीर निर्वासितांनी दिलेल्या मुदतीत देश न सोडल्यास अटक आणि हद्दपार करण्याची धमकी पाकिस्ताननने दिली होती.

1 नोव्हेंबरची अंतिम मुदत जवळ आल्यानंतर अनेक निर्वासितांनी सीमेवर धाव घेत पाकिस्तान सोडण्यास सुरूवात केली होती. आता अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 1 लाख 65 हजार अफगाण निर्वासितांनी पाकिस्तान सोडला आहे.

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील तोरखाम येथील देशातील सर्वात व्यस्त सीमेवरील अधिकाऱ्यांनी गुरूवार आणि शुक्रवार पहाटेपर्यंत सात किलोमीटरपर्यंत पसरलेल्या २८,००० लोकांची रांग कमी करत त्यांना अफगाणिस्तानमध्ये पाठवण्याची सोय केली.

सीमावर्ती जिल्ह्याचे उपायुक्त अब्दुल नासिर खान यांनी एएफपीला सांगितले की, "1 नोव्हेंबर अंतिम मुदत होती म्हणून बेकायदेशीर अफगाणी लोक मोठ्या संख्येने तोरखम येथे आले होते.

सीमेच्या अफगाण बाजूचे अधिकारी मोठ्या प्रमाणात लोकं येत असल्याचे पाहून भारावून गेले आहेत. कारण ते परत आलेल्या लोकांची कायदेशीर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे या इतक्या मोठ्या संख्येमध्ये काहीजण त्यांच्या आयुष्यात प्रथमच अफगाणिस्तानात पाऊल ठेवत आहेत.

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सरकारने सत्ता काबीज केल्यापासून आणि इस्लामिक कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंदाजे 600,000 अफगाण नागरिक पलायन करून अलीकडच्या दशकांमध्ये पाकिस्तानात दाखल झाले आहेत.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, तालिबान सरकारला सुरक्षा मुद्द्यांवर सहकार्य करण्यास भाग पाडण्यासाठी पाकिस्तान ही दबावाची युक्ती वापरत आहे.

इस्लामाबादमधील अफगाण दूतावासाने म्हटले आहे की, या निर्णयामुळे दोन शेजारी देशांमधील संबंध आणखी बिघडतील.

कागदपत्रे नसलेल्या अफगाण निर्वासितांच्या हकालपट्टीला पाकिस्तानी नागरिकांचा व्यापक पाठिंबा आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानात मोठ्या संख्येने असलेल्या बेकायदेशीर निर्वासितांमुळे देशाच्या पायाभूत सुविधांवर मोठा भार पडत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT