32 people died in a fire at a Drug Rehab Center in Iran:
उत्तर इराणमधील गिलान राज्यातील एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये शुक्रवारी सकाळी भीषण आग लागून किमान 32 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मिझान ऑनलाइन न्यूज वेबसाइटने प्रांताचे मुख्य न्यायमूर्ती इस्माईल सदेघी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, लॅंग्रोड शहरातील व्यसनमुक्ती केंद्राला भीषण आग लागल्याने 27 लोक ठार झाले आहेत आणि 12 अधिक रुग्णालयात दाखल आहेत.
तर रॉयटर्सच्या वृत्ताने 32 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
व्यसनमुक्ती केंद्राची क्षमता सुमारे 40 लोकांची असल्याचे सांगितले जाते. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
स्थानिक बातम्यांनुसार, सध्या तपास सुरू आहे. मागील घटनांनी इराणमधील उपचार केंद्रांचे धोके अधोरेखित केल्याच्या आरोपानंतर ही घटना घडली आहे. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
याआधी सप्टेंबरमध्ये इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या कार बॅटरीच्या कारखान्यात आग लागली होती. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
यावेळी अतिशय भीषण आग लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक दगावले. लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
ऑगस्टच्या सुरुवातीला, तेहरानच्या ग्रँड बाजारमध्ये आग लागली होती, त्यामध्ये अनेक दुकानांचे नुकसान झाले परंतु कोणतीही जीवित हाणी झाली नाही.
यापूर्वीची सर्वात भीषण आगीची घटना जानेवारी 2017 मध्ये घडली होती जेव्हा तेहरानमधील 15 मजली प्लास्को शॉपिंग सेंटरला लागलेल्या आगीत 16 अग्निशमन दलाच्या जवानांसह किमान 22 लोकांचा मृत्यू झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.