General Qamar Javed Bajwa Dainik Gomantak
ग्लोबल

चीन-पाकिस्तान संबंधावर जनरल बाजवा पुन्हा म्हणाले...

जनरल बाजवा (General Qamar Javed Bajwa) चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 94व्या वर्धापन दिनानिमित्त पाकिस्तानी लष्करांकडून आयोजित कार्यक्रमाला संबोधित करत होते.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानी लष्कर (Pakistani Army) प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (General Qamar Javed Bajwa) यांनी बदलत असणाऱ्या सुरक्षा परिवेश क्षेत्रामध्ये शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) यांच्यातील द्वीपक्षीय संबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी चीन आणि पाकिस्तानने आपलं हितं लक्षात घेत त्यांचं रक्षणही केलं पाहिजे. पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, जनरल बाजवा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 94व्या वर्धापन दिनानिमित्त पाकिस्तानी लष्करांकडून आयोजित कार्यक्रमाला संबोधित करत होते.

त्यांनी पुढे म्हटले, आपला इतिहास आणि आजचा वर्तमान या गोष्टीची ग्वाही देतो की, आपल्या कितीही कठीण आव्हाने आली तरी न डगमगता त्याचा सामना केला पाहिजे. त्या कठीण आव्हानांचा आम्ही निकराने सामना करतो. चीनची पीपल्स आर्मी आणि पाकिस्तानी रेंजर्स यांचे हित एकमेकांशी घनिष्ठ आहेत.

तसेच त्यांनी चीनची सुरक्षा आणि राष्ट्र निर्माणामध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीच्या भूमिकेचे तोंड भरुन कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानमधील चीनी राजदूत आणि चिनी दूतावासमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही उपस्थित होते. याच कार्यक्रमात चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले की, चीन आणि पाकिस्तान यांचे द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत. जगामध्ये होत असलेल्या बदलांना स्वीकारत आम्ही आमच्या राष्ट्राची संप्रभुता, क्षेत्रीय अखंडता, क्षेत्रीय शांती आणि स्थीरतेची सुरक्षा राखण्यासाठी आम्ही नेहमी कठिबध्द असणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT