Cristina Dimitrenko Dainik Gomantak
ग्लोबल

ऑलिम्पिक शूटर युक्रेनियन सैन्यात सामील; दिली रशियन सैन्याला धमकी

ऑलिम्पिक स्टार नेमबाज क्रिस्टीना दिमित्रेन्को देशाच्या रक्षणासाठी सैन्यात सामील झाली आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांतील हजारो लोकांचा मृत्यू देखील झाला आहे, ज्यात बहुतांश सैनिकांचा समावेश आहे. युक्रेनने आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सामान्य लोकांना सैन्यात भरती करण्याची मोहीम राबवली आहे. या मोहिमेत खेळाडू, अधिकारी, अभिनेते आणि मॉडेल्सही सहभागी होताना दिसून येत आहेत. या एपिसोडमध्ये, ऑलिम्पिक स्टार नेमबाज क्रिस्टीना दिमित्रेन्को (Cristina Dimitrenko) देशाच्या रक्षणासाठी सैन्यात सामील झाली आहे. (Olympic shooter joins Ukrainian army Russian troops have been threatened)

22 वर्षीय दिमित्रेन्कोने 2016 च्या युवा ऑलिम्पिक गेम्समध्ये बायथलॉनमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. हा एक खेळ आहे ज्यामध्ये क्रॉस-कंट्री स्कीइंग आणि रायफल शूटिंग या दोन्हींचा समावेश असतो. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून, क्रिस्टीना दिमिट्रेन्को उत्तरेकडील चेर्निहाइव्ह शहरात पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत होती. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने त्यांच्या देशावर आक्रमण केल्यानंतर दिमित्रेन्कोसाठी सर्व काही बदलून गेले. आता ती आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी युक्रेनियन नॅशनल गार्डसह कर्तव्य बजावत आहे.

युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने फेसबुकवर क्रिस्टीना दिमिट्रेन्कोचा हातात एके-203 मशीन गन असलेला फोटो पोस्ट केला आहे आणि सैन्यात सामील झाल्याची माहिती दिली आहे. सैन्यात रुजू होताच क्रिस्टीना दिमित्रेन्को यांनी रशियन सैन्याला यासंदर्भांत इशाराही दिला आहे. ती म्हणाले की, माझे लक्ष्य इतके अचूक आहे की शत्रूला पळून जाण्याची एकही संधी त्यांना मिळणार नाही. आता माझ्या हातात रायफल ऐवजी मशीनगन असली तरी मला आश्चर्य वाटणार नाहीये. माझ्या हातात जे काही शस्त्र असेल, मग मी खेळात असो किंवा सैन्यात असो, मी शेवटपर्यंत उभी लढत राहणारर आहे. ती म्हणाले की मला शत्रूची भीती नाहीये. क्रिस्टीना दिमित्रेन्को या उत्तर युक्रेनमधील चेर्निहाइव्ह शहरातील रहिवासी आहे.

युक्रेनने खार्किवमधील दुसऱ्या शहरातून रशियन सैन्य मागे घेतले तसेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी शनिवारी सांगितले की डॉनबासमधील परिस्थिती अत्यंत कठीण राहिली असली तरी, सैन्य जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न मी करत आहे. पण मेजर जनरल किर्लो बुडानोव्ह या युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टच्या मध्यापर्यंत युद्ध एका महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचेल आणि या वर्षाच्या अखेरीस ते संपेल सुद्धा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT