Oklahoma Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Oklahoma Shooting: US गोळीबारात 1 ठार तर 7 जखमी

ओक्लाहोमा येथील मेमोरियल डे उत्सवाशी संबंधित आहे, जेथे गोळीबारात एक व्यक्ती ठार झाला आहे आणि सात जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. अमेरिकेतून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. हे प्रकरण ओक्लाहोमा येथील मेमोरियल डे उत्सवाशी संबंधित आहे, जेथे गोळीबारात एक व्यक्ती ठार झाला आहे आणि सात जण जखमी झाले आहेत. (Oklahoma shooting 1 killed 7 injured in US shooting)

तशी अमेरिकन मीडियातून ही माहिती समोर आली आहे. याआधी टेक्सासमधील एका शाळेतील विद्यार्थ्याने 19 विद्यार्थ्यांसह 21 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील उवाल्डे शहरामध्ये 24 मे रोजी झालेल्या गोळीबारात 19 मुले आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला होता.

धक्कादायक घटना

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत गोळीबार करणारा 18 वर्षीय हल्लेखोर साल्वाडोर रामोस हा मुळात गुन्हेगारी स्वभावाचा नव्हताच. 24 मे रोजी, त्याने उवाल्दे शहरातील राब येथे प्राथमिक शाळेत AR-15 अर्ध-स्वयंचलित रायफलने गोळीबार केला होता, ज्यात 19 मुलांसह 21 लोक ठार झाले होते. त्याने त्याच्या आजीला शूटिंग करून मारून तो शाळेत पोहोचला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden), उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

अध्यक्ष बायडेन यांनी कडक इशारा दिला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) म्हणाले की, रॉब एलिमेंटरी शाळेमध्ये घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. राष्ट्राला संबोधित करताना बायडेन पुढे म्हणाले की, 'आता कृती करण्याची वेळ आली आहे. जे कॉमन सेन्स गन कायद्याला वेळ लावतात किंवा त्यामध्ये अडथळा आणतात त्यांना हे सांगणे आवश्यक आहे. आम्ही त्यांना विसरणार नाहीये. या दुःखात विचारात बेडवर झोपून विचारात पडलेल्या माता पित्यांच्या सोबत आमची प्रार्थना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT