देवबंदमध्ये दुसऱ्या दिवशी जमियत उलेमा-ए-हिंदची (Jamiat Ulema-e-Hind) बैठक पार पडली आहे. यादरम्यान, ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) आणि मथुरा शाही ईदगाह (Shahi Mosque Eidgah) सारख्या प्रकरणांसह जमियतने अनेक प्रस्ताव मंजूर केले आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जमियतचे अध्यक्ष मौलाना मेहमूद मदनी म्हणाले की, प्रत्येक गोष्टीवर सहमती असू शकते परंतु विचारधारेशी तडजोड होऊ शकणार नाही. पुढे मदनी म्हणाले की, शरियतमध्ये हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाहीये. (Jamiat Ulema e Hind Maulana Madani Says Ideology Cannot Be Compromised Question Of Our Existence)
आधी देश वाचवायचा आहे, मदनी
मौलाना महमूद मदनी म्हणाले की, आज आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मुस्लिमांना अत्याचार सहन करण्याची सवय झाली आहे, आधी देश वाचवायचा आहे. म्हणूनच आपण देशाबद्दलच बोलतोय, पण त्यामुळेही अनेकांच्या पोटात दुखताना दिसत आहे. राष्ट्रवादाबद्दल बोलले तर ते बरोबरच आहे, पण जर आपण याबद्दल बोललो तर त्याला ढोंगी म्हणता येईल. या देशाच्या रक्षणासाठी आपण आपला जीव गमावला तर ती आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असणार आहे.
'तुम्ही धमकावण्याचं काम करता'
मदनी आपल्या भाषणात म्हणाले की, त्यांना आमच्या राहणीमानामध्ये द्वेष कुठून दिसतोय. आम्ही तुम्हाला घाबरत नाहीये, तुम्ही फक्त धमकावण्याचे काम करता. आम्ही कोणी गैर नाही आहोत, आम्ही या देशाचे आहोत, हा आपलाच देश आहे. आम्ही आमच्या देशासाठीची जबाबदारी नक्कीच पार पाडू. आमची संस्कृती, खाणेपिणे वेगळे... आमचा धर्म तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही दुसरीकडे जावा. तो क्षुल्लक गोष्टीवर म्हणतात की पाकिस्तानात जावा. आम्हाला संधी मिळाली होती, पण आम्ही ती नाकारली.
जमियतच्या या बैठकीत मदनी पुढे म्हणाले की, आम्ही ऋषिकेश ते दिल्लीपर्यंत हजारो झाडे लावली आहेत. मंदिर, मशिदी, शाळांमध्ये झाडे लावण्यात आली आहेत. या पावसाळ्यातही अशीच मोहीम राबवण्यात येणार आहे. लोक काहीह बोलतील, लिहतील... पण त्यांची पर्वा नाहीये. ते पुढे म्हणाले की, आम्ही खूप दिवसांनी येथे सर्वांशी भेटत आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.