Organisation of Islamic Cooperation Dainik Gomantak
ग्लोबल

OIC Meeting: काश्मीर मुद्द्यावरून चीन, पाकिस्तानला भारताने सुनावले खडे बोल

इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन मध्ये चीनने काश्मीरचा उल्लेख केल्याने त्यावरती भारताने आक्षेप घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (Organisation of Islamic Cooperation) मध्ये चीनने (Chiana) काश्मीरचा (kashmir) उल्लेख केल्याने त्यावरती भारताने (India) आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, इस्लामाबादमध्ये ओआयसीच्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी ज्या पद्धतीने काश्मीरचा उल्लेख केला तो पूर्णपणे अनावश्यक होता. आम्ही ते नाकारतो. काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय असून त्यावर चीनसह तिसर्‍या कोणत्याही देशाने भाष्य करु नये आणि ते नाहक असल्याचे ही भारताने म्हटले आहे. (OIC Meeting India responds to China and Pakistan over Kashmir issue)

जगातील मुस्लिम देशांचा आवाज उठवण्यासाठी इस्लामिक सहकार्य संघटनेची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्द राखून मुस्लिम जगाच्या हिताचे रक्षण करणे हा या संघटनेचा प्रथम उद्देश आहे. 22 आणि 23 मार्च रोजी इस्लामाबादमध्ये या 57 सदस्यीय मंडळाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले आहे. मंगळवारी उद्घाटनाच्या सत्रात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी ओआयसीच्या मंचावरून काश्मीरचे सूर उमटवले आहेत. आपण दीड अब्ज मुस्लिम आहोत पण काश्मीर आणि पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलो आहोत, असे इम्रान खान यावेळी म्हणाले होते. काश्मीरवर आमचा प्रभाव नाहीये. ते कधीही आम्हाला गांभीर्याने घेत नाहीत. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा बेकायदेशीरपणे रद्द केला, पण त्याने काहीही झाले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

भारताने: काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय आहे

या बैठकीत उपस्थित असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनीही काश्मीरचा रोखून उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, “आम्ही पुन्हा काश्मीरवर आमच्या अनेक इस्लामिक मित्रांची हाक ऐकली आणि चीनलाही तीच अपेक्षा आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार प्रतिक्रिया दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ओआयसीच्या उद्घाटन समारंभात केलेल्या भाषणात भारताला दिलेला संदर्भ अनावश्यक होता आणि आम्ही तो साफ नाकारतो. बागची म्हणाले की, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे. चीनसह इतर देशांना यावर भाष्य करण्याचा अधिकार नाहीये. भारत त्या देशांच्या अंतर्गत प्रश्नांवर जाहीर वक्तव्ये करण्याचेही टाळतो, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

चीनचे परराष्ट्र मंत्री लवकरच भारत दौऱ्यावरती?

भारताचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा चीनचे परराष्ट्र मंत्री 24 मार्च रोजी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा रंगत आहे. युक्रेनवर (Ukraine) रशियाच्या (Russia) हल्ल्यावरून जगात निर्माण झालेल्या गदारोळात चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा संभाव्य दौरा होणार आहे. जगात फक्त चीन आणि भारत आहेत, जे उघडपणे रशियाविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. आणि त्यामुळे अमेरिका वगैरे देशांमध्येही तीव्र नाराजी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT