'...माफी मागा', जमैकामध्ये प्रिन्स विल्यम अन् केट मिडलटन यांचा होतोय विरोध

ब्रिटिश राज राजघराण्याचे (British Royal Family) प्रिन्स विल्यम (Prince William) आणि त्यांची पत्नी केट मिडलटन कॅरेबियन देशांच्या दौऱ्यावर आहेत.
Prince William & Catherine Middleton
Prince William & Catherine MiddletonDainik Gomantak

ब्रिटिश राज राजघराण्याचे (British Royal Family) प्रिन्स विल्यम (Prince William) आणि त्यांची पत्नी केट मिडलटन कॅरेबियन देशांच्या दौऱ्यावर आहेत. परंतु जमैकामध्ये त्यांच्या दौऱ्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांपासून ते प्राध्यापक आणि राजकारण्यांपर्यंत, ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज या भेटीला विरोध करत आहेत. ब्रिटनने (Britain) माफी मागावी आणि शेकडो वर्षांच्या गुलामगिरीची भरपाई द्यावी, अशी मागणी जमैकन नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रिन्स विल्यम हा राणी एलिझाबेथ II (Britain Queen Elizabeth II) चा नातू आहे. दोघेही मंगळवारी संध्याकाळी जमैकाची राजधानी असणाऱ्या किंग्स्टनमध्ये पोहोचले होते. शाही जोडप्याची भेट जमैकाच्या (Jamaica) स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेकाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आहे. (Prince William and Catherine Middleton are facing opposition from citizens in Jamaica)

दरम्यान, एक पत्रक समोर आले आहे, ज्यावर जमैकाच्या 100 नेत्यांनी स्वाक्षरी केली आहे. ज्यावर जमैकाच्या 100 नेत्यांनी स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये, त्यांनी म्हटले आहे की, राणीचा राज्याभिषेक 'साजरा करण्याचे कोणतेही कारण नाही. कारण त्यांचे नेतृत्व आणि त्यांच्या आधीच्या लोकांनी मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मानवी हक्काच्या शोकांतिकेस कायम ठेवले आहे.

Prince William & Catherine Middleton
तुमच्या गप्पा Google या Apps द्वारे चोरी करतोय; रिसर्चमधून मोठा खुलासा

'राणीने 70 वर्षांत काहीही केले नाही'

शिवाय, त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की, '' या 70 वर्षांत तुमच्या आजीने आमच्या पूर्वजांच्या दुःखाचे निवारण आणि प्रायश्चित्तासाठी काहीही केले नाही. ब्रिटीशांनी आफ्रिकन लोकांची तस्करी, गुलामगिरी आणि वसाहतीकरण केले.' मंगळवारी किंग्स्टनमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले. इथे लोकांनी पारंपारिक गाणी गायली आणि बॅनर दाखवत निषेध व्यक्त केला. बॅनरवर माफी मागावी असं लिहलं होतं.''

लोकांविरोधात मोठा गुन्हा केला

इथे आलेल्यांपैकी एकाने सांगितले की, 'मला ब्रिटीश राजवटीला सांगायचे आहे की, त्यांनी आफ्रिकन लोकांवर अन्याय केला. त्यामुळे त्यांनी माफी मागून आमच्या पूर्वजांकडून जे काही घेतले आहे, ते परत करावे.' ब्रिटिशांच्या 300 वर्षांहून अधिक सत्तेच्या काळात, हजारो गुलाम आफ्रिकन लोकांनी जमैकामध्ये कठोर परिश्रम केले. त्याचबरोबर क्रूर परिस्थितीचा सामनाही केला. दुसरीकडे स्वातंत्र्यांसाठी या काळात बऱ्याच नेत्यांनी बंडखोरीही केली.'

Prince William & Catherine Middleton
हिटलर पासून वाचले, मात्र पुतीनने मारले

शिवाय, जमैकन नेत्यांनी सांगितले की, 'ते आमच्या देशाच्या स्वातंत्र्याचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आले आहेत. परंतु ब्रिटनने आमच्या पूर्वजांची माफी मागावी.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com