Pakistan's PM Shahbaz Sharif | India's PM Narendra Modi  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: जगाकडे भीक मागुनही फायदा नाही; आता केवळ मोदींचाच आधार

पाकिस्तानी पत्रकाराने पंतप्रधान शरीफ यांना सुनावले...

Akshay Nirmale

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूप खालावल्याने हा देश आर्थिकदृष्ट्या कोसळण्याच्या मार्गावर आहे. देशात चलन साठ्याची कमतरता आहे, महागाई शिगेला पोहोचल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पाकिस्तानी मीडिया देशाच्या या स्थितीबद्दल पंतप्रधान शाहबाज शरिफ यांच्या सरकारला शिव्याशाप देत आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना कर्जाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी म्हणाले की पाकिस्तानच्या शेहबाज शरीफ सरकारने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. कारण आता जगातील अनेक देश पाकिस्तानला कर्ज देऊ इच्छित नाहीत. पाकिस्तान जगाकडे भीक मागत आहेत, पण त्यांना कोणीही कर्ज द्यायला तयार नाही. अशा स्थितीत पंतप्रधान शऱीफ यांनी मोदींकडे पाहिले पाहिजे.

पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी यूट्यूब चॅनलवर देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेसाठी सरकारला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, आर्थिक संकटावर मात करण्यासाठी शाहबाज जगभरातील देशांना भेटी देण्यात व्यस्त आहेत. ते इतर देशांकडून कर्जाची मागणी करत आहेत, परंतु जगातील अनेक देश आता पाकिस्तानला पैसे देऊन कंटाळले आहेत. आता जागतिक बँकही पाकिस्तानला पैसे देण्यापूर्वी गांभीर्याने विचार करत आहे.

काझमी म्हणाले की, अमेरिका आणि चीनची अर्थव्यवस्थाही चांगली नाही. आम्ही सर्वांना कर्ज देणार नाही, असेही सौदी अरेबियाने म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानच्या प्रत्येक नेत्यामध्ये एवढे टॅलेंट आहे की, त्याने मागितले तर त्यांना नक्कीत मदत मिळेल.

पाकिस्तान सरकारने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींकडे मैत्रीचा हात पुढे करावा. मोदीजींकडून अपेक्षा केली जाऊ शकते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनीही सरकारची खिल्ली उडवली आणि ते म्हणाले की, शहबाज शरीफ भिकेचा कटोरा घेऊन जगभर फिरत आहेत परंतु कोणालाही कर्ज फेडायचे नाही.

परत पंतप्रधान म्हणून परत निवडून दिले तर देश वाचेल. शाहबाज शरीफ हे केवळ स्वतःवरील खटले संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान बनले आहेत, अशी टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT