Jeff Bezos: 'या' कारणामुळे 'वॉशिंग्टन पोस्ट' वर्तमानपत्र विकणार जेफ बेझॉस?

2013 मध्ये 250 मिलियन डॉलरला विकत घेतले होते हे वर्तमानपत्र
Jeff Bezos
Jeff BezosDainik Gomantak

Jeff Bezos: अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे 'वॉशिंग्टन पोस्ट' हे वर्तमान पत्र विकून वॉशिंग्टन कमांडर्स हा फुटबॉल संघ विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. न्यूयॉर्क पोस्टने एका बातमीतून हा दावा केला आहे.

दरम्यान, बेझोस यांनी मात्र हा दावा नाकारला आहे. त्यांच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार वॉशिंग्टन पोस्ट हे वर्तमानपत्र विकले जाणार नाही.

Jeff Bezos
Pakistan: खलिस्तानी दहशतवाद्यांना ISI पुरवतेय शस्त्रे, भारतात घातपात घडवून आणण्यासाठी...!

विशेष म्हणजे 2013 मध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी 250 मिलियन डॉलरमध्ये वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतले होते. आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि ऑनलाइन विस्तारास प्रोत्साहन देण्यासाठी बेझोसने 2013 मध्ये त्याचे माजी मालक डोनाल्ड ग्रॅहम यांच्याकडून वृत्तपत्र विकत घेतले.

तथापि, बेझोस यापूर्वीच स्पष्ट केले होते की वृत्तपत्राची मालकी हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. 2022 मध्ये वितरणात घट झाल्याने बेझोस यांना गेल्या वर्षी यामुळे वॉशिंग्टन पोस्टमुळे तोटा सहन करावा लागला होता.

Jeff Bezos
Paris Abortion Law: पॅरिसमधील रस्त्यावर अचानक टॉपलेस झाल्या महिला; पाहा व्हायरल व्हिडिओ

प्रसारमाध्यमांतील दाव्यांनुसार आता बेझोस वॉशिंग्टन कमांडर्स हा फुटबॉल संघ खरेदी करण्यासाठी या संघाचे मालक डॅन स्नायडर यांच्या संपर्कात आहेत. कमांडर्सनी 1983, 1988 आणि 1992 मध्ये लोंबार्डी ट्रॉफी जिंकून तीन सुपर बाउल जिंकले आहेत.

बेझॉस यांचे फुटबॉल प्रेम सर्वश्रृत आहे. त्यांनी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी हे फुटबॉलप्रेम दाखवून दिले आहे. तथापि, स्वतःला नॅशनल फुटबॉल लीग (NFL) संघाशी जोडून घेण्याबाबत त्यांनी कधीही वाच्यता केली नव्हती. परंतु आता ते वॉशिंग्टन कमांडर्स संघ खरेदी करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com