Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Goa Politics Vijay Sardesai Girish Chodankar Meeting: शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यात अखेर युतीबाबत प्राथमिक चर्चा झाली.
Goa Politics Vijay Sardesai Girish Chodankar Meeting
Goa Politics Vijay Sardesai Girish Chodankar MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी/मडगाव: कुशावती जिल्ह्यातील आठही जागा काँग्रेस जिंकणार, या जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर यांच्या वक्तव्यावर मित्रपक्ष गोवा फॉरवर्डने केलेली टीका आणि त्यातून दोन्ही पक्षांच्या संबंधांत तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू असतानाच शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यात अखेर युतीबाबत प्राथमिक चर्चा झाली.

युतीतील सर्वांत कळीचा मुद्दा असलेल्या जागावाटपावर मात्र या पहिल्या बैठकीत ‘ब्र’ही काढण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.दुसरीकडे, ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी आघाडीची आपल्या पक्षाची तयारी असल्याचे नमूद केले तर ‘आप’नेही या आघाडीत सहभागी होण्यासाठी समन्वय समितीत सकारात्मक निर्णय घेतले आहेत. भाजपविरोधी आघाडीत ‘आप’ आणि ‘आरजी’ हेही सहभागी होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यात यश येईल, असे चित्र तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, गोवा फॉरवर्ड हा आमच्या युतीतील घटक पक्ष असून त्यांच्याशी लवकरच चर्चा सुरू केली जाईल, असे काँग्रेसकडून यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जवळपास दीड महिना प्रत्यक्ष चर्चा झाली नव्हती.

अखेर शनिवारी या चर्चेला ‘मुहूर्त’ मिळाला. विशेष म्हणजे, सरदेसाई यांनी स्वतः चोडणकर यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. काणकोण येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत युतीची बोलणी पुढे नेण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले होते.

त्यानुसार शनिवारी चोडणकर यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील संबंधांबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असून, यात गोव्याचे हित सर्वांत वर ठेवले जाईल. आघाडीचा भविष्यातील आराखडा अत्यंत पारदर्शक पद्धतीने लोकांसमोर मांडला जाईल आणि प्रत्येक निर्णयात गोव्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवले जाईल.- विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड

गोव्याच्या व्यापक हितासाठी ही युती अधिक मजबूत करण्याच्या महत्त्वावर आम्ही चर्चा केली. आगामी रणनीती आणि रोडमॅपचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी लवकरच औपचारिक चर्चा करू, जेणेकरून सर्वांमध्ये एकमत निर्माण होईल. - गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Goa Politics Vijay Sardesai Girish Chodankar Meeting
Goa Accident: भीषण अपघात! पणजीहून मडगावकडे जाणारी कार डिव्हायडरवर आदळून पेटली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

‘आप’च्या ‘आघाडी समन्वय समिती’ची पणजीमध्ये बैठक झाली. त्यात निवडणुकीसाठी आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू; त्यानुसार, ‘समन्वय समिती आगामी काळात काँग्रेसचे गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई आणि आरजीपी नेते वीरेश बोरकर यांची भेट घेणार आहे. -वाल्मिकी नाईक, आप.

गोवा राखण्यासाठी करणार युती : वीरेश

जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. जरी भाजप भाषणांमध्ये जनहिताच्या गोष्टी करत असले तरी त्यांची कृती वेगळी आहे. आम्ही भाजपविरोधात लढा देत आहोत त्यामुळे भाजपशी आमची युती होऊच शकत नाही. परंतु, येत्या काही दिवसांत ‘आरजी’च्या संघटनात्मक समित्या स्थापना झाल्यावर पक्ष संघटनेशी चर्चा करून जनतेच्या हितासाठी, गोवा राखण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी बाकावरील आमच्या समविचारी पक्षांशी ‘कॉमन मिनिमम’ कार्यक्रम ठरवून युती करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे ‘आरजी’चे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी सांगितले.

Goa Politics Vijay Sardesai Girish Chodankar Meeting
Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर हायकोर्टाची दखल; राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीस

गाडी रुळावर; पण...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीत जागावाटपाचा मुद्दा मात्र पहिल्या बैठकीत चर्चेलाच आला नाही. त्यामुळे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर युतीच्या चर्चेची गाडी अखेर रुळावर आली असली, तरी जागावाटपाचा खरा कसोटीचा टप्पा अद्याप बाकी आहे.

भाजपविरोधात एकसंध पर्यायावर भर

भाजप सरकारविरोधात मजबूत आणि एकसंध पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने विजय आणि गिरीश यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. पहिली बैठक सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात झाल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com