North Korea Army Parade Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea Army Parade: किम जोंग-उनची बायको त्याच्यापेक्षाही वरचढ, गळ्यातला 'मिसाईल नेकलेस' देतोय खास मॅसेज

नॉर्थ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्या पत्नीचे फोटो व्हायरल झाले आहे.

दैनिक गोमन्तक

किम जोंग-उनची पत्नी री सोल-जू हिने एका लष्करी समारंभात उत्तर कोरियाच्या आण्विक शक्तीबाबत अनोखा संदेश दिला आहे. कोरियन पीपल्स आर्मीच्या 75 व्या लष्करी समारंभात पती आणि मुलीसह सहभागी झालेल्या जू यांनी आपल्या नेकलेसच्या माध्यमातून जगाला इशारा दिला. 

खरं तर री सोल जू यांनी त्यांच्या गळ्यात बैलिस्टिक मिसाइल मॉडेलचा हार घातला होता. त्यांनी गळ्यात घातलेला हार अमेरिकेसह अनेक देशांमध्ये अणुहल्ला करण्यास सक्षम असलेल्या मिसाइलचा होता.

  • कार्यक्रमात दिसली किमची कन्या

उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये झालेल्या या कार्यक्रमात किमची मुलगी किम जू आय तिचे वडील आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांसोबत कार्यक्रमात आणि त्यानंतरच्या लष्करी मेजवानीत हजेरी लावतांना दिसली. 

उत्तर कोरियाच्या राज्य माध्यमांनी वृत्त दिले की किमचे दुसरे अपत्य किम जू ए याने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता आणि ते वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांसह लष्करी डिनरला उपस्थित होते. 

किम जू एच्या या सार्वजनिक हजेरीनंतर उत्तर कोरियामध्ये ए तिच्या वडिलांची पुढील उत्तराधिकारी असेल की नाही अशी अटकळ बांधली जात होती. तज्ञांनी हा दावा तूर्तास फेटाळला आहे.

उत्तर कोरियाचा मिसाइल कार्यक्रम म्हणजे काय?

अमेरिकेने (America) त्यांच्या देशावर निर्बंध लादले असतानाही उत्तर कोरिया सातत्याने अण्वस्त्रांचे प्रदर्शन करत आहे. नवीन वर्षाच्या (New Year) निमित्ताने किमने आपल्या सैन्यासह उत्तर कोरियाच्या लोकांना कमी पल्ल्याच्या आण्विक मिसाइलचे प्रक्षेपण करण्याचे वचन दिले. 

उत्तर कोरियाच्या राज्य नियंत्रित माध्यमांनी माहिती दिली की यावर्षी त्यांच्या सरकारचे लक्ष नवीन कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या प्रचंड दबावानंतरही उत्तर कोरियाने 70 हून अधिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. दक्षिण कोरिया बिनदिक्कतपणे धोकादायक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये गुंतला आहे, त्यासाठी त्यांनीही युद्धासाठी तयार राहण्याची गरज असल्याचा आरोप किम यांनी केला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' परदेशी सुंदरींचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Election 2027: 'मिशन गोवा'साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत रणनीतीवर शिक्कामोर्तब; विजयाची हॅट्ट्रिकसाठी 'जनसंपर्क पॅटर्न'

"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

SCROLL FOR NEXT