Turkey-Syria Earthquakes: भूकंपाची भीषणता वाढली; आतापर्यंत 24 हजार नागरिकांचा मृत्यू

भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली आहे.
Turkey-Syria Earthquakes
Turkey-Syria EarthquakesDainik Gomantak

Turkey-Syria Earthquakes' Updates: तुर्की आणि सीरिया झालेल्या जबरदस्त भुकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. यामुळे शेकडो इमारती कोसळल्या आहेत. या घटनेत आत्तापर्यंत 24 हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून तब्बल 10 लाख नागरिकांना खाण्यासाठी अन्न नाही. सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यात 8 वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळत आहेत. तर ढिगाऱ्याखाली अकडल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तुर्कस्तान व सीरियातील भूकंप बळींची संख्या 24  हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट देत आहेत. एकट्या तुर्कस्तानमधील मृतांची संख्या साडे आठ हजारांच्या पुढे गेली आहे.

एएनआयने थोड्यावेळापुर्वीच भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 वर्षाच्या मुलीची सुटका करतांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, भूकंपामुळे अचडणीत सापडलेल्या तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी भारतासह अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय हवाई दलाचे ‘एसी-17’ विशेष विमान राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकासह भूकंपग्रस्त तुर्की, सीरियाच्या मदतीसाठी मंगळवारी रवाना झाले. सध्या भारताचे वैद्यकीय पथक ठिकठिकाणी काम करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com