North Korea Missile Test Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea Missile Test: उत्तर कोरियाचा अमेरिका, जपानसह दक्षिण कोरियाला 'जोर का झटका'; पुन्हा केली क्षेपणास्त्र चाचणी

North Korea Missile Test: उत्तर कोरियाने पुन्हा एकदा मोठी क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे, ज्यामध्ये घन इंधन आहे.

Manish Jadhav

North Korea Missile Test: उत्तर कोरियाने पुन्हा एकदा मोठी क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे, ज्यामध्ये घन इंधन आहे. या मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीने पुन्हा एकदा उत्तर कोरियाने अमेरिका, जपानसह दक्षिण कोरियाला मोठा झटका दिला आहे. उत्तर कोरियाला सातत्याने क्षेपणास्त्रांची चाचणी करुन या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. किम जोंग यांच्या सततच्या चाचण्यांमुळे जपान आणि शेजारी देश दक्षिण कोरिया चिंतेत आहे. विशेष म्हणजे, उत्तर कोरिया आपल्या क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे अप्रत्यक्षपणे अमेरिकेला धमकावत आहे.

अमेरिकन टार्गेटवर हल्ला करण्यास सक्षम क्षेपणास्त्रः उत्तर कोरिया

उत्तर कोरियाने सोमवारी सांगितले की, त्यांनी हायपरसॉनिक वॉरहेडसह सुसज्ज नवीन घन-इंधन मध्यम-श्रेणीच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. उत्तर कोरियाचे म्हणणे आहे की, हे क्षेपणास्त्र विशेषतः या भागातील अमेरिकेच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी तयार केले आहे. हे क्षेपणास्त्र अधिक शक्तिशाली असून ते लक्ष्य शोधून त्याच्यावर हल्ला करते.

2024 ची पहिली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी

दक्षिण कोरिया आणि जपानी सैन्याने उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग जवळील साइटवरुन क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा खुलासा केल्यानंतर उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाचा रिपोर्ट समोर आले आहे. 2024 मधील उत्तर कोरियाची ही पहिली बॅलेस्टिक चाचणी आहे. यापूर्वी, उत्तर कोरियाने नवीन घन-इंधन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर दोन महिन्यांनी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, रविवारच्या प्रक्षेपणाचा उद्देश क्षेपणास्त्राच्या घन-इंधन इंजिनची विश्वासार्हता आणि हायपरसॉनिक वॉरहेडच्या गतिशील उड्डाण क्षमतेची पुष्टी करणे आहे. त्याने चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले आहे, परंतु यासंबंधीची अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

FDA Raid: दिवाळीसाठी मिठाई घेताय? मग काळजी घ्या! गोव्यात ‘एफडीए’कडून अस्वच्छ कलाकंद, मावा, बर्फी जप्त

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

रोजच्या वापरातील खाण्याच्या तेलामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो? अभ्यासातून समोर आली धक्कादायक नवी माहिती

SCROLL FOR NEXT