North Korea: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये किम जोंग महिलांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना रडताना आणि अश्रू पुसताना दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान किम जोंग यांनी उत्तर कोरियातील घटत्या प्रजनन दरावर चिंता व्यक्त केली आणि महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करताना ते भावूक झाले होते.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या कार्यक्रमात किम जोंग म्हणाले की, "प्रजनन दरात होणारी घट रोखण्यासाठी आणि मुलांची चांगली काळजी घेण्यासाठी मातांसह काम करणे ही सर्व कुटुंबांची जबाबदारी आहे."
किम जोंग उन यांनी याबाबत महिलांना (Women) बोलावून ही समस्या सांगितली. किम असे म्हणाले की, 'जन्मदर कमी होण्यापासून रोखणे आणि मुलांची चांगली काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. जन्मदरातील ही घसरण थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. किम जोंग पुढे म्हणाले की, 'प्रत्येक महिलेला याचा सामना करावा लागतो.' दुसरीकडे, उत्तर कोरियाच्या आजूबाजूच्या देशांमध्येही जन्मदर घटला आहे. यामध्ये चीन, दक्षिण कोरिया आणि जपान प्रमुख आहेत.
युनायटेड नेशन्स (United Nations) पॉप्युलेशन फंडच्या अंदाजानुसार, उत्तर कोरियामध्ये सध्याचा प्रजनन दर सध्या 1.8 आहे. उत्तर कोरियातील प्रजनन दर गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने घसरला आहे. तथापि, उत्तर कोरियामधील प्रजनन दर अजूनही शेजारील देश दक्षिण कोरिया (जनन दर: 0.78) आणि जपान (प्रजनन दर: 1.26) पेक्षा जास्त आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.