Nigeria Mosque Attack X
ग्लोबल

Nigeria Mosque Attack: नमाजावेळी मशिदीवर गोळीबार; 50 जण ठार, 60 जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Nigeria Mosque Attack: काटसिना राज्यातील उनगुवान मानटाऊ भागात असलेल्या एका मशिदीत नमाज अदा करण्यासाठी स्थानिक एकत्र आले होते. यावेळी बंदूकधारी काहीजण मशिदीत दाखल झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

नायजेरिया: नाजेरियातील वायव्य भागात एका मशिदीवर अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून, यात ५० स्थानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुधवारी (२० ऑगस्ट) मशिदीत नमाजावेळी ही घटना घडल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. या ठिकाणावरून ६० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

काटसिना राज्यातील उनगुवान मानटाऊ भागात असलेल्या एका मशिदीत नमाज अदा करण्यासाठी स्थानिक एकत्र आले होते. यावेळी बंदूकधारी काहीजण मशिदीत दाखल झाले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला.

या गोळीबारात ३० लोकांचा जागीच मृत्यू तर २० जण जळून मृत्यूमुखी पडले. याप्रकरणी कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारली नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अशा पद्धतीच्या घटना देशात सामान्य असल्याचे मत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी नोंदवले आहे.

नाजेरियाच्या वायव्य आणि उत्तर प्रांतात अशा घटना सामान्य असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. जमीन आणि पाणी या मुद्यावरुन शेतकरी आणि स्थानिक नेहमीच झगडत असतात. गेल्या महिन्यात उत्तर प्रांतात झालेल्या अशा प्रकारच्या हल्ल्यात १५० नागरिकांचा मृत्यू झाला होता.

गेल्या काही वर्षात या वादाला हिंसक वळण लागले असून, अनेकांनी शस्त्र हातात घेत लढा पुकारला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर घटनास्थळी व आसपासच्या परिसरात सैन्य तैनात करण्यात आले आहे.

फुलानी जातीच्या पशुपालन करणाऱ्या नागरिकांना शेतकऱ्यांनी त्यांचे पीक नुकसानीचा दोष दिला आहे. तर, पशुपालन करणारे नागरिक देखील त्यांच्या विविध मागण्यांवर ठाम आहेत. याशिवाय देशात बोको हराम घुसखोरांची देखील नाजेरियासाठी डोकेदुखी ठरत आहे. युएनच्या अहवालानुसार, यात ३५,००० नागरिकांचा मृत्यू झाला असून, जवळपास वीस लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT