Niger President Mohamed Bazoum  Dainik Gomantak
ग्लोबल

Niger Soldiers Announce Coup: नायजरमध्ये तख्तापलट, लष्कराद्वारे राष्ट्रपतींना अटक; देशाच्या सीमाही केल्या बंद!

Niger President Mohamed Bazoum: लष्कराच्या अधिकार्‍यांनी देशावर आपली सत्ता घोषित करुन विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बेजोम यांना कैद केले आहे. लष्कराने थेट टीव्हीवर येऊन नव्या निजामाची घोषणा केली.

Manish Jadhav

Niger President Mohamed Bazoum: पश्चिम आफ्रिकन देश नायजरमध्ये बुधवारी तख्तापलट झाला. लष्कराच्या अधिकार्‍यांनी देशावर आपली सत्ता घोषित करुन विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद बेजोम यांना कैद केले आहे.

लष्कराने थेट टीव्हीवर येऊन नव्या निजामाची घोषणा केली. राष्ट्रपतींच्या अटकेत त्यांच्याच अंगरक्षकांचा समावेश आहे. दुसरीकडे, नायजरमधील या घटनेचा जगातील अनेक देशांनी निषेध केला.

बीबीसीच्या वृत्तानुसार, नायजरच्या लष्करी अधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे की संविधान, देशातील सर्व संस्था बंद करण्यात आल्या आहेत, देशाच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती बुधवारपासून नायजर लष्कराच्या ताब्यात आहेत.

राष्ट्रपती भवनाजवळ समर्थक जमले

राष्ट्रपतींच्या अटकेची बातमी मिळाल्यापासून त्यांचे समर्थक राष्ट्रपती भवनाजवळ जमले असून, राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांनी त्यांना कैद केल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मोहम्मद बेजोम 2021 मध्ये नायजरचे राष्ट्रपती झाले.

निवडणुकीतील (Election) विजयानंतर, सत्तेत बसण्यापूर्वीच तख्तापलटाचा प्रयत्न झाला होता. 1960 पासून देशात चार वेळा लष्करी राजवट आली आहे.

वास्तविक, नायजरचे राष्ट्रपती बेजोम यांना पाश्चात्य देशांचा पाठिंबा होता. नायजरमध्ये उपस्थित असलेल्या अल कायदा आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात ते सातत्याने कारवाई करत होते.

नायजरला जगाचा पाठिंबा मिळाला

पश्चिम आफ्रिकन देशात झालेल्या या उलथापालथीनंतर विविध देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी लष्कराच्या या कारवाईचा निषेध केला असून राष्ट्रपती मोहम्मद बेजोम यांना पाठिंबा दर्शवला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही मोहम्मद बेजोम यांना शक्य ती सर्व मदत देण्याचे सांगितले आहे.

पश्चिम आफ्रिकेतील इस्लामिक दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नायजर हा महत्त्वाचा भागीदार आहे, पाश्चात्य देश आणि संयुक्त राष्ट्र नायजरच्या मदतीने मोठे ऑपरेशन चालवत आहेत.

लष्कराच्या वतीने तख्तापलटाची घोषणा करणारे कर्नल मेजर अमदौ अब्राहमन म्हणाले की, लष्कराने सध्याचे सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर आम्ही हे पाऊल उचलले आहे.

देशातील सर्व संस्था बंद करण्यात आल्या आहेत, मंत्रिमंडळातील लोकच देशासाठी मोठे निर्णय घेतील. लष्कराकडून पाश्चात्य देशांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT