Bjørnar Moxnes
Bjørnar MoxnesDainik Gomantak

Viral Video: गॉगलची चोरी महागात; गमावले पक्षाचे अध्यक्षपद अन् खासदारकी

Bjørnar Moxnes: मला याची पूर्ण खात्री आहे की मी काहीतरी चुकीचे केले आहे आणि त्याचे परिणाम मला स्वीकारले पाहिजेत.
Published on

Bjørnar Moxnes Leader of Norway Red party Resigns for Stealing Sunglasses: ओस्लो येथील टॅक्स-फ्री शॉपमध्ये ह्यूगो बॉसचे सनग्लासेस चोरताना सीसीटीव्हीमध्ये पकडल्यानंतर नॉर्वेचे खासदार ब्योर्नर मोक्सनेस यांनी अखेर राजीनामा दिला.

सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.

मॉक्सनेस यांनी 11 वर्षे नॉर्वेच्या रेड पार्टीचे नेते म्हणून काम केले आहे. ही घटना 16 जून रोजी घडली आणि फुटेज व्हायरल झाल्यानंतर, 41 वर्षीय मॉक्सनेस रजेवर गेले होते.

Bjørnar Moxnes
India-China: भारत अन् चीनची दक्षिण आफ्रिकेत खलबतं; डोवाल-वांग यांच्यात जोहन्सबर्गमध्ये काय घडलं?

वृत्तानुसार, मोक्सने यांनी सुरुवातीला सांगितले की तो विसरभोळे असल्याने ती घटना घडली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज प्रसारित झाल्यानंतर त्यांनी अनेक वेळा आपले स्पष्टीकरण बदलले.

30 जून रोजी, मोक्सनेसने सांगितले की त्याला 1,199 क्रोनर (जवळपास 10,000 रुपये) किमतीचे ह्यूगो बॉस सनग्लासेस चोरल्याबद्दल 3,000 क्रोनर (सुमारे 24,000 रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे.

सोमवारी, या खासदाराने डिझायनर सनग्लासेस चोरल्याचे कबूल केले आणि त्यानंतर राजीनामा दिला. त्याने आपल्या फेसबुक पेजवर चोरीबद्दल माफी मागणारे निवेदनही पोस्ट केले आहे.

अनेकांनी विचारले आहे की मी इतके मूर्ख कसे वागू शकतो. गेल्या आठवड्यात मी स्वतःला असे अनेक वेळा विचारले आहे. मला हवे तसे स्पष्टीकरण मिळाले नाही. मात्र, मला याची पूर्ण खात्री आहे की मी काहीतरी चुकीचे केले आहे आणि त्याचे परिणाम मला स्वीकारले पाहिजेत. या संपूर्ण 11 वर्षांमध्ये, आम्ही इतिहास रचला आहे, आणि या माध्यमातून (रेड पार्टी) नेतृत्व करण्यासाठी विश्वास ठेवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
खासदार ब्योर्नर मोक्सनेस यांची फेसबुक पोस्ट

रेड पार्टीच्या कार्यकारी समितीने निर्णय घेतला आहे की मोक्सनेस यांच्या जागी मेरी स्नेव्ह मार्टिनुसेन यांची नियुक्ती केली जाईल. मोक्सनेस यांनी 11 वर्षे पक्षाचे नेतृत्व केले.

Bjørnar Moxnes
Pakistan: इमरान खान यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाने उचलले मोठं पाऊल

मोक्सनेस यांच्यावरील पोलीस कारवाई बाबत त्यांच्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, मोक्सनेस यांनी सांगितले की जरी हा अनुभव लाजीरवाणा असला तरी पोलिस त्यांचे काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com