New York Flood Dainik Gomantak
ग्लोबल

New York Flood: रस्ते ब्लॉक, कार बुडाल्या अन् उड्डाणे रद्द; न्यूयॉर्कमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार

New York News: गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले की, न्यूयॉर्क एक विलक्षण हवामान घटना अनुभवत आहे ज्याने राज्यातील अनेक समुदायांना उद्ध्वस्त केले आहे.

Ashutosh Masgaunde

Flood hits New York: जगभरात मुसळधार पावसामुळे पुराची समस्या निर्माण होत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये पुराचा धोका आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने आग्नेय न्यू यॉर्कच्या काही भागांसाठी पुराचा इशारा दिला आहे.

हडसन व्हॅलीमध्ये पूर आल्याने न्यू यॉर्क दुसर्‍या दिवशीही जलमय राहिले, ज्यामुळे लाखो डॉलर्सचे नुकसान होऊ शकते असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

गव्हर्नर कॅथी हॉचुल म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये एक विलक्षण हवामानाची घटना घडत आहे ज्याने राज्यातील अनेक समुदायांना उद्ध्वस्त केले आहे.

मुसळधार पावसामुळे घरे वाहून गेल्याने अनेक लोक बेपत्ता झाल्याची नोंद असताना मृतांची संख्या वाधत आहे.

न्यू यॉर्कच्या पुराबद्दलचे अपडेट्स

न्यू यॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया, मॅसॅच्युसेट्स आणि व्हरमाँटच्या काही भागांसाठी पूराचा इशार जारी करण्यात आली होती, या प्रदेशातील राज्यांमध्ये वेगवान पाऊस आणि अचानक पूर आला आहे.

व्हरमाँट अर्बन सर्च अँड रेस्क्यूचे माईक कॅनन म्हणाले की, उत्तर कॅरोलिना, मिशिगन आणि कनेक्टिकटमधील कर्मचारी या राज्यात मुसळधार पावसामुळे दुर्गम राहिलेल्या शहरांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहेत.

सर्वात वाईट प्रभावित ठिकाणांपैकी न्यूयॉर्कची हडसन व्हॅली आहे, जिथे फोर्ट माँटगोमेरी गावात पूरग्रस्त घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना एका महिलेचा मृत्यू झाला.

पूरग्रस्त भागात बचावकार्यात मदत करण्यासाठी राज्याकडून पाच जलद जल बचाव पथके आणि एक हाय एक्सल वाहन तैनात करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA ODI Series: रोहित-विराट खेळणार, पण नेतृत्व बदलणार! वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार मोठा बदल; कोणाच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ?

SIR प्रक्रियेत गोवा अव्वल! 11.85 लाख फॉर्मचे वितरण 4 दिवसांत पूर्ण; 10 दिवसांत 55 टक्के फॉर्म गोळा

Fatorda Car Fire: फातोर्डा जिल्हा कोर्टाबाहेर कारला भीषण आग! गाडी जळून खाक, जीवितहानी टळली; कारण अद्याप गुलदस्त्यात

Tenant Verification Goa: उत्तर गोवा पोलिसांची मोठी मोहीम! प्रतिबंधात्मक पोलीसिंगला धार; 66 हजारांहून अधिक भाडेकरुंची पडताळणी

Goa Politics: "मुख्यमंत्र्यांची बैठक 'फोटोसेशन'साठी", वेन्झी व्हिएगस यांची राज्यपालांकडे 'पूर्णवेळ गृहमंत्र्या'ची मागणी

SCROLL FOR NEXT