Exercise And Depression: मधुमेह अन् हृदयविकार रुग्णांच्या नैराश्यावर तज्ज्ञांनी शोधला नवा फॉर्म्यूला; पाच दिवस दररोज करा...

Depression: हृदयविकाराच्या रुग्णांना त्यांच्या निदानानंतर नैराश्य आले तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट असते.
Exercise And Depression
Exercise And DepressionDainik Gomantak
Published on
Updated on

20 Minutes of Exercise Will Relieve Depression: आठवड्यातून पाच दिवस दररोद 20 मिनिटांचा मध्यम व्यायाम, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मधुमेह, हृदयविकार आणि तीव्र वेदना यांसारख्या आजारांचा सामना करणाऱ्यांचा व्यक्तींचा नौराश्याचा धोका कमी करू शकतो. असे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे.

डायबिटीज यूके नुसार मधुमेह असलेल्या लोकांना नैराश्याचा धोका दुप्पट असतो आणि 2017 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, हृदयविकाराच्या रुग्णांना त्यांच्या निदानानंतर नैराश्य आले तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट असते.

अभ्यासात असे दिसून आले आहे की लोक व्यायामासाठी जितका जास्त वेळ घालवतील ते तितके त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

जे लोक दिवसातून 20 मिनिटे, आठवड्यातून पाच दिवस मध्यम व्यायाम करतात, त्यांच्यामध्ये नैराश्याची लक्षणे 16% कमी होती आणि ज्यांनी व्यायाम केला नाही त्यांच्या तुलनेत मोठ्या नैराश्याचा धोका 43% कमी होता.

ज्या लोकांना जुनाट आजार नाहीत पण ते नैराश्यात आहेत, अशांना आपली परिस्थिती सुधारण्यासाठी दिवसातून दोन तास मध्यम ते उच्च तिव्रतेने व्यायाम करणे आवश्यक आहे, असे मत अभ्यासाचे प्रमुख लेखक इमॉन लेयर्ड यांनी मांडले आहे.

10 वर्षांचा अभ्यास

जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 4,000 आयरिश प्रौढ व्यक्ती 10 वर्षांपर्यंत सहभागी झाल्या ज्यांचे सरासरी वय 61 आहे.

जे आयरिश लोक या अभ्यासाचा भाग होते, त्यांचे दर दोन वर्षांनी मूल्यांकन केले गेले. त्यांना त्यांच्या शारीरिक हालचालींबद्दल आणि व्यायामाच्या पातळीबद्दल विचारले गेले. तसेच त्यांच्या नैराश्याची पातळी तपासण्यासाठी विविध चाचण्या घेण्यात आल्या.

Exercise And Depression
Sudan War: 'बलात्कारापासून वाचवण्यासाठी लहान वयातच मुलींना...', सुदान बनला मुलींसाठी नरक

फेब्रुवारीमध्ये प्रकाशित झालेल्या दुसर्‍या मोठ्या आभ्यासात असे आढळून आले आहे की, शारीरिक हालचाल तणाव, चिंता आणि नैराश्याची सौम्य-ते-मध्यम लक्षणे कमी करण्यासाठी अँटीडिप्रेसंट औषधे किंवा संज्ञानात्मक वर्तन थेरपीपेक्षा 1.5 पट अधिक प्रभावी आहे. ज्याला सुवर्ण मानक उपचार मानले जाते.

नैराश्य कमी करण्यापेक्षा व्यायाम एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो. व्यायामामुळे शरीत आकारात राहते, ते कार्यक्षमतेने कार्य करण्यास आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी सक्षम राहते.

Exercise And Depression
Russia-Ukraine War: 'झेलेन्स्कीचे शिर घेऊन या...', पुतिन यांनी वॅगनर ग्रुपला दिला खतरनाक टास्क!

डॉ. अँड्र्यू फ्रीमन, डेनवर, कोलोरॅडो येथील नॅशनल ज्यू हेल्थ येथे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रतिबंध आणि निरोगीपणाचे संचालक, यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "नियमीत व्यायमाचे नैराश्य दूर करण्यासह शरीलालाही अनेक फायदे होतात.

तसेच जर तुम्ही अधिक वनस्पती-आधारित आहार खात असाल, स्व:ताला तणावमुक्त ठेवत असाल, पुरेशी झोप घेत असाल आणि इतरांशी मिसळून राहत असात तर ही जादूची कृती आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com