नेपाळमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. सोलुखुंबू परिसरात लँडिंग करण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक बसली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघाताचा व्हिडीओही समोर आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील सोलुखुंबू येथे दोन हेलिकॉप्टर लँडिंग करत असताना हा अपघात झाला. दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या दुर्घटनेशी संबंधित व्हिडीओ समोर आल्याने हेलिकॉप्टरच्या धडकेची तीव्रता चर्चेचा विषय ठरली आहे. अपघातानंतर संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. हेलिकॉप्टरमधील इतर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या स्थितीबाबत अधिकृत तपशील मिळणे बाकी आहे. अपघाताचे नेमके कारण आणि इतर संभाव्य नुकसान याबाबत पुढील तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.
फ्लोरिडामध्ये व्यावसायिक जेट कोसळले
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये आणखी एक दुर्घटना घडली. सोमवारी, दक्षिण फ्लोरिडामधील एका निवासी भागात एक व्यावसायिक जेट कोसळले, ज्यात विमानातील सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला. पाम बीच काउंटीच्या क्रेस्टहेवन परिसरात दुपारी सुमारे १२:५० वाजता हे जेट कोसळले आणि आगीच्या मोठ्या गोळ्यात रूपांतरित झाले. हा अपघात पाम बीचमधील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो या रिसॉर्टपासून सुमारे नऊ मैल (१४ किमी) अंतरावर घडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.