Bus Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Bus Accident: पहाटेच्या गाढ झोपेत काळानं घातला घाला! पृथ्वी महामार्गावरुन बस थेट त्रिशूली नदीत कोसळली; 18 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Nepal Bus Accident Trishuli River: नेपाळमधील धादिंग जिल्ह्यातील गजुरी या ठिकाणाजवळून वाहणाऱ्या त्रिशूली नदीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस कोसळल्याने 18 जणांचा जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

Trishuli River Bus Crash : नेपाळची राजधानी काठमांडूपासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर सोमवारी (23 फेब्रुवारी) पहाटे एक अतिशय भीषण आणि हृदयद्रावक बस अपघात घडला. नेपाळमधील धादिंग जिल्ह्यातील गजुरी या ठिकाणाजवळून वाहणाऱ्या त्रिशूली नदीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस कोसळल्याने 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. या भयानक दुर्घटनेत अन्य 26 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, बस पुलावरुन थेट नदीच्या पात्रात कोसळली आणि प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. पोखरा या प्रसिद्ध पर्यटन स्थळावरुन काठमांडूच्या दिशेने येणारी ही बस पृथ्वी महामार्गावरुन प्रवास करत होती. पहाटे 1:30 च्या सुमारास, जेव्हा बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते, तेव्हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस त्रिशूली नदीच्या खोल पात्रात कोसळली.

नेपाळ (Nepal) सशस्त्र पोलीस दलाचे प्रवक्ते बिष्णू प्रसाद भट्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ रवाना करण्यात आली. घटनास्थळावरुन आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर बसमधून 28 प्रवाशांना सुखरुप किंवा जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले आहे. या बचावकार्यासाठी नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक नेपाळ पोलीस दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

नदीचा प्रवाह आणि अंधार यामुळे बचावकार्यात सुरुवातीला अनेक अडथळे आले, मात्र जवानांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न केले. या अपघातातील मृतांमध्ये न्यूझीलंडच्या एका पुरुष प्रवाशाचा समावेश असल्याचे समोर आले आहे, तर जखमींमध्ये जपानची एक महिला आणि नेदरलँड्सची (डच) एक महिला नागरिक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अपघाताचे (Accident) नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बसचा अतिवेग हे या भीषण दुर्घटनेमागचे मुख्य कारण असू शकते. महामार्गावरील वळणावर चालकाला बसचा वेग मर्यादित ठेवता आला नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. नेपाळमधील डोंगराळ रस्ते आणि महामार्गांवर रात्रीच्या वेळी होणारे असे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासन करत आहे. या घटनेमुळे नेपाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT