Nepal Interim PM Sushila Karki
Sushila KarkiDainik Gomantak

Nepal Interim PM: सुशीला कार्की यांनी रचला इतिहास, बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान VIDEO

Nepal Interim PM Sushila Karki: सुशीला कार्की यांचा जन्म 7 जून 1952 रोजी नेपाळमधील विराटनगर येथे झाला. त्यांचे शिक्षण एका सामान्य कुटुंबातून सुरु झाले.
Published on

Nepal Interim PM Sushila Karki: बांगलादेशनंतर नेपाळमधील तरुणांनी रस्त्यावर उतरुन केपी शर्मा ओली यांचे सरकार उलथवून लावले. सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर हा आगडोंब उसळला. याच पार्श्वभूमीवर आता, नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे देशाची तात्पुरती सूत्रे सोपवण्यात आली. कार्की नेपाळच्या पहिल्या महिला कार्यकारी प्रमुख (Executive Head) बनल्या, जो त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 'द काठमांडू पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, जुलै 2016 मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनल्यानंतरचा हा त्यांचा दुसरा ऐतिहासिक मैलाचा टप्पा आहे.

नेपाळमधील राजकीय घडामोडी

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नेपाळमध्ये (Nepal) राजकीय अस्थिरता शिगेला पोहोचली. सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर तरुणांनी रस्त्यावर उतरुन जोरदार विरोध प्रदर्शने सुरु केली. या विरोध प्रदर्शनांनी इतके उग्र रुप धारण केले की, ओली यांना पंतप्रधान पद सोडावे लागले. एवढचं नाहीतर स्वतः ओली यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली. या परिस्थितीमुळे नेपाळमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे बिघडले. अशा अराजकसदृश परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी आणि नवीन सरकार स्थापनेपर्यंतची जबाबदारी पार पाडण्यासाठी अंतरिम सरकारची गरज होती. याच गरजेतून सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली.

Nepal Interim PM Sushila Karki
Nepal Violence: पशुपतिनाथाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भारतीयांच्या बसवर हिंसक जमावाचा हल्ला! मारहाण करुन लुटले सामान; अनेकजण जखमी

सुशीला कार्की: एक धाडसी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व

सुशीला कार्की यांचा जन्म 7 जून 1952 रोजी नेपाळमधील विराटनगर येथे झाला. एका सामान्य कुटुंबात सुशिला यांचा जन्म झाला. मात्र शिक्षणाच्या जोरावर त्यांनी अनेक महत्त्वाचे पदे भूषवली. 1972 मध्ये त्यांनी विराटनगर येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1975 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. 1978 मध्ये त्यांनी त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण (Education) पूर्ण केले.

Nepal Interim PM Sushila Karki
Nepal Gen Z Protest: नेपाळ देशात आता लष्कराची हुकूमत; फ्रान्समध्येही सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष, पोलिस बळाचा वापर

शिक्षणानंतर त्यांनी 1979 मध्ये विराटनगरमध्ये वकिली करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी 1985 मध्ये धरन येथील महेंद्र मल्टिपल कॅम्पसमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम केले. त्यांच्या न्यायालयीन कारकिर्दीत 2009 हे वर्ष एक महत्त्वाचा टप्पा ठरले, जेव्हा त्यांची सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. कठोर आणि निर्भीड स्वभावामुळे त्यांची ओळख समाजामध्ये वाढत गेली.

Nepal Interim PM Sushila Karki
Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश

2010 मध्ये सुशीला कार्की यांना सर्वोच्च न्यायालयात कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. त्यांच्या कामाची दखल घेऊन 2016 मध्ये त्या काही काळासाठी कार्यवाहक मुख्य न्यायाधीशही बनल्या. त्यानंतर 11 जुलै 2016 ते 6 जून 2017 या कालावधीत त्यांनी नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला, जो एक ऐतिहासिक क्षण होता.

एकंदरीत, सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून झालेली निवड ही केवळ एक राजकीय घडामोड नाही, तर महिला सक्षमीकरण आणि न्यायनिष्ठ नेतृत्वाचा एक महत्त्वाचा संदेश आहे. त्यांच्यासमोर देशातील शांतता आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान आहे. नेपाळच्या जनतेला त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com