Nepal Plane Crash Enquiry Report Mentioned Human Error Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Plane Crash: पायलटने चुकीचा लीव्हर ओढला आणि विमान कोसळले; 72 जणांचा मृत्यू- रिपोर्ट

Nepal: अपघाताची चौकशी करणाऱ्या समितीने आपल्या प्राथमिक अहवालात हा खुलासा केला आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) मधून अनेक खुलासे झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Manish Jadhav

Nepal Plane Crash Enquiry Report Mentioned Human Error: पायलटने चुकीचा लीव्हर ओढला, त्यामुळे विमान कोसळले आणि 72 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताची चौकशी करणाऱ्या समितीने आपल्या प्राथमिक अहवालात हा खुलासा केला आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) मधून अनेक खुलासे झाल्याचे अहवालात म्हटले आहे. रेकॉर्डिंगनुसार, सर्व इंजिन योग्यरित्या कार्य करत होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) ने 10:57:07 वाजता विमानाला उतरवण्याची परवानगी दिली. पायलट फ्लाइंग (पीएफ) ने दोनदा सांगितले की, इंजिनमध्ये पॉवर नाही. अपघाताच्या वेळी दृश्यमानता सुमारे 6 किलोमीटर होती. आकाश जवळजवळ निरभ्र झाले होते. अशा परिस्थितीत, पायलटने चुकून कंडिशन लीव्हर ओढला असावा, ज्यामुळे इंजिन बंद झाले. अपघातस्थळी चौकशी केल्यानंतरही कंडिशन लीव्हर ओढल्याचे आढळून आले. त्यामुळेच हा अपघात झाला.

दरम्यान, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (ICAO) नुसार, विमानातील वैमानिकांना कठोर प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण दिल्यानंतर चाचणी घेऊनच त्यांना परवाना दिला जातो. लोकांचे प्राण त्यांच्या हातात असतात, असे असूनही, पायलटने एवढी मोठी चूक कशी केली की त्याला योग्य लीव्हर ओळखता आला नाही? विमान उड्डाण करताना त्याची मानसिक स्थिती योग्य नव्हती की त्याने नकळत ही चूक केली? यासाठी कोणाला जबाबदार धरायचे? कॉकपिटमध्ये पायलटची एकाग्रता भंग झाल्याचेही तपासात समोर आले आहे. असे दिसते की, त्याने सह-पायलटच्या वारंवार कॉलकडे दुर्लक्ष केले. पायलटचे हे पहिलेच उड्डाण होते आणि त्याच्या एका चुकीमुळे हा अपघात झाला आणि 72 जणांना आपला जीव गमवावा लागला. अंतिम तपास अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

ना इंजिनमध्ये बिघाड आढळला, ना अन्य तांत्रिक बिघाड आढळून आला

अपघातापूर्वी इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही इंजिन निष्क्रीय झाले होते. त्यामुळे इंजिनमध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर कोणत्याही तांत्रिक यंत्रणेत बिघाड झाल्याचा पुरावा सापडला नाही. जेव्हा विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 6500 फूट उंचीवर 15 मैलांवर होते, तेव्हा पायलटला रनवे 30 वर उतरण्यास सांगण्यात आले, परंतु पायलटने एटीसीला विनंती केली आणि रनवे 12 वर उतरण्यासाठी मंजुरी मिळाली. 10:51:36 वाजता विमान 6500 फूट खाली उतरले. 10:56:12 वाजता पायलटने 721 फूट उंचीवर ऑटोपायलट प्रणाली बंद केली. FDR ने त्यावेळी कोणत्याही फ्लॅप हालचालीची नोंद केली नाही. दोन्ही इंजिनांचा प्रोपेलर रोटेशन स्पीड (NP) एकाच वेळी 25 टक्क्यांहून कमी झाला आणि टॉर्क 0 टक्क्यांपर्यंत कमी झाला, परिणामी विमान कोसळले.

दुसरीकडे, 15 जानेवारी 2023 रोजी नेपाळमधील पोखरा विमानतळावर उतरत असताना यती एअरलाईन्सचे विमान सेती नदीत कोसळले होते. या फ्लाइटमध्ये 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते, ज्यांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या तपास अहवालात अपघाताचे कारण मानवी चुका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT