Nepal Plane Crash Video Photos: नेपाळमध्ये कोसळलेल्या विमानाचा थरारक व्हिडिओ आणि फोटो आले समोर

विमान काठमांडूहून पोखराला जात असताना पोखरा विमानतळावर लँडिंगवेळी हा अपघात झाला.
Nepal Plane Crash
Nepal Plane Crash Twitter
Published on
Updated on

नेपाळमध्ये रविवारी (15 जानेवारी) एक प्रवासी विमान कोसळून 60 जणांचा मृत्यू झाला असून, हा आकाडा वाढण्याची शक्यता आहे. विमान काठमांडूहून पोखराला जात असताना पोखरा विमानतळावर लँडिंगवेळी हा अपघात झाला. विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. अपघात झालेले विमान यती एअरलाईन्सचे आहे. पोखरा येथील सेती खोच येथे हे विमान कोसळले असून त्यानंतर विमानाला आग लागली.  दरम्यान, विमान काही कोसळतानाचा एक व्हिडिओ आणि कोसळल्यानंतर विमानाचा झालेला चक्कचूर याचे काही समोर आले आहेत.

Nepal Plane Crash
Nepal Plane Crash: नेपाळमध्ये विमान कोसळून 60 प्रवासी ठार

पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यामुळे विमानाला आग लागली. लँडिंग करताना विमानाचा गेलेला तोल याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

Nepal Plane Crash
Indigo Flight Flight Emergency: इंडिगो फ्लाइटचे 'या' कारणामुळे करण्यात आले इमर्जन्सी लँडिंग
Nepal Plane Crash
Nepal Plane Crash Twitter

विमान अपघातग्रस्त होताच त्याला भीषण आग लागली. दरम्यान, बचाव दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Nepal Plane Crash
Nepal Plane Crash Twitter

विमानात अकरा परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. अपघाताच्या वेळी विमानात 53 नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता.

Nepal Plane Crash
NASA Research: 'या' कारणामुळे नासाने व्यक्त केली चिंता, वाचा कारण
Nepal Plane Crash
Nepal Plane Crash Twitter

खराब हवामानामुळे ही घटना घडली असावी, असा निष्कर्ष नेपाळ सरकारच्या चौकशी अहवालात आला आहे. विमान अपघाताची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षांत किमान 27 विमान अपघात झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com