US Plane Crashes: जपानजवळील समुद्रात कोसळले अमेरिकन लष्करी विमान, अद्याप जीवितहानी नाही!

US Plane Crashes: जपानजवळ एक अमेरिकन लष्करी विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे.
US Plane Crashes
US Plane CrashesDainik Gomantak
Published on
Updated on

US Plane Crashes: जपानजवळ एक अमेरिकन लष्करी विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, अमेरिकन लष्करी विमान ओस्प्रे जपानजवळील समुद्रात कोसळले. याकुशिमा दीपजवळ विमान कोसळले. यावेळी त्यात एकूण आठ प्रवासी होते. यासंदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

डाव्या इंजिनला आग लागली

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपानी तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानातील लोकांच्या सुरक्षेसह या घटनेबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.47 वाजता हा अपघात झाला. स्थानिक लोकांनी सांगितले की, अमेरिकन लष्करी विमान समुद्रात पडताच त्याच्या डाव्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. या भागातील अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते अद्याप या घटनेसंबंधी अधिक माहिती घेत आहेत. जपानमधील अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्याने यावर अद्याप काहीही सांगितलेले नाही.

US Plane Crashes
Plane Crash In US: अमेरिकेत विमान दुर्घटनेत भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू, तर दोघे जखमी

यापूर्वीही विमान कोसळले होते

याकुशिमा बेट हे जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्युशूच्या दक्षिणेला आहे. याआधी ऑस्प्रेचे आणखी एक विमान उत्तर ऑस्ट्रेलियात कोसळले होते. ऑगस्टमध्ये झालेल्या या अपघातात तीन अमेरिकन नौसैनिकांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी विमानात एकूण 23 जण होते. ऑगस्टमध्ये उत्तर ऑस्ट्रेलियातील आणखी एका ऑस्प्रेच्या क्रॅशनंतर हा अपघात झाला, ज्यामध्ये 23 लोकांपैकी तीन यूएस मरीन ठार झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com