Nawaz Sharif statement on POK elections Dainik Gomantak
ग्लोबल

'मला POK चा पंतप्रधान व्हायचंय'! नवाझ शरीफची अजब इच्छा अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा; हिंसाचाराच्या सावटाखाली होणार निवडणुका

Nawaz Sharif POK Prime Minister Claim: मुझफ्फराबाद येथील एका भव्य राजकीय रॅलीत बोलताना पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी उघडपणे सांगितले की, जर त्यांचा पक्ष या निवडणुकीत विजयी झाला, तर त्यांना PoK चे पंतप्रधान व्हायला आवडेल.

Manish Jadhav

Nawaz Sharif POK Prime Minister Claim: पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. शाहबाज शरीफ सरकारच्या धोरणांविरोधात आणि वाढत्या महागाईविरुद्ध तेथील नागरिक रस्त्यावर उतरुन निदर्शने करत आहेत. मात्र आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या हिंसक कारवाईत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीच्या (JAAC) नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या निदर्शनांना दडपण्यासाठी सरकारने बंदी घातली असली, तरी जनतेचा संताप अनावर झाला आहे. या उग्र आंदोलनांमुळे आणि बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारने PoK मध्ये 27 जुलैपासून टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याची घोषणा केली.

याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केलेल्या एका इच्छेने संपूर्ण जगात मोठी चर्चा घडवून आणली. मुझफ्फराबाद येथील एका भव्य राजकीय रॅलीत बोलताना पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी उघडपणे सांगितले की, जर त्यांचा पक्ष या निवडणुकीत विजयी झाला, तर त्यांना PoK चे पंतप्रधान व्हायला आवडेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभेत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.

आपल्या या इच्छेमागील कारण स्पष्ट करताना नवाझ शरीफ म्हणाले की, PoK चा पंतप्रधान बनल्यास त्यांना या भागातील विकासकामांवर थेट आणि वैयक्तिकरीत्या लक्ष ठेवता येईल. ज्याप्रमाणे त्यांनी पाकिस्तानचा विकास केला, त्याच धर्तीवर त्यांना PoK मध्ये रस्ते, रुग्णालये आणि पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे. पंजाबप्रमाणेच PoK हे त्यांचे 'दुसरे घर' असल्याचे सांगत त्यांनी आपले पूर्वज काश्मीरमधूनच आल्याची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, पक्ष जिंकल्यास ते आपले भाऊ व विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे PoK चे नेतृत्व सोपवण्याची थेट मागणी करतील.

आगामी निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या पक्षाची थेट लढत सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीशी असणार आहे. एकीकडे महागाई, सैन्याची दडपशाही आणि शरणार्थींच्या राखीव जागांवरुन संपूर्ण PoK होरपळत असताना, दुसरीकडे नवाझ शरीफ यांच्या या राजकीय दाव्यामुळे पाकिस्तानातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT