Nawaz Sharif Dainik GomaNtak
ग्लोबल

Nawaz Sharif: मायभूमीत परतताच शरीफ यांचे भारताबद्दल मोठे वक्तव्य

Nawaz Sharif: पाकिस्तानमध्ये परतल्यावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी रॅलीचे आयोजन केले होते. यारॅलीदरम्यान त्यांनी शेजारी देशांबरोबरच्या संबंधावर भाष्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Nawaz Sharif: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीएमएल (एन) पक्षाचे संस्थापक नवाझ शरीफ पाकिस्तानात परतले आहेत. शरीफ 2019 पासून लंडनमध्ये होते. गुरुवारी स्थानिक न्यायालयाने नवाझ शरीफ यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षानंतर पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांनी भारताबरोबर संबंध सुधारण्याचे वक्तव्य केले आहे.

शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध

पाकिस्तानमध्ये परतल्यावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी रॅलीचे आयोजन केले होते. यारॅलीदरम्यान त्यांनी शेजारी देशांबरोबरच्या संबंधावर भाष्य केले आहे. परराष्ट्र धोरण कसे असावे यावरही त्यांनी वक्तव्य केले आहे.

'आम्हाला स्वतंत्र आणि सर्वसमावेशक परराष्ट्र धोरण हवे आहे. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून पाकिस्तानला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. इतरांशी लढून किंवा संघर्ष करून पाकिस्तानचा विकास होऊ शकत नाही.

माझा विकासावर विश्वास आहे, बदला घेण्यावर नाही. या रॅलीत नवाज यांनी भारत, बांगलादेश तसेच लष्कराचा उल्लेख केला. 'जर पाकिस्तान पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) पासून वेगळा झाला नसता तर भारतातून एक आर्थिक कॉरिडॉर गेला असता. पाकिस्तान( Pakistan )च्या विकासासाठी आम्हाला शेजारी आणि जगाशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. असेही नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.

संविधानाचे पालन करावे लागेल

नवाझ यांनी लष्करावर भाष्य करत म्हटले की, 'पाकिस्तानच्या फायद्यासाठी सर्व राजकीय संघटना आणि संस्था (लष्कर आणि न्यायव्यवस्था) यांना खऱ्या भावनेने संविधानाचे पालन करावे लागेल.'

शरीफ झाले भावूक

रॅलीदरम्यान शरीफ भावूक झाले आणि तुरुंगात असताना त्यांना त्यांच्या आई आणि पत्नीच्या मृत्यूच्या बातमीचा कसा सामना करावा लागला. 'राजकारणामुळे' त्यांनी आई आणि पत्नी गमावल्याचे सांगताना नवाज शरीफ भावूक झाल्याचे दिसून आले. त्याला सांगितले की आजपर्यंत तो दिवस आठवतो जेव्हा ते त्याच्या आई, वडील किंवा पत्नीला शेवटची आदराजंली देऊ शकला नाहीत असेही नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.

नवाज शरीफ यांच्या काळातील भारताबरोबरचे संबंध

नवाज शरीफ पंतप्रधान असताना कारगिल युद्ध घडले होते. त्यामुळे आता जरी शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध चांगले होण्याची गरज आहे असे ते म्हणत असले तरी त्यांच्या कार्यकाळात कारगिल युद्ध झाल्याने हा भारतासाठी मोठा विश्वासघात मानला जातो. आता शरीफ यांच्या वक्तव्यावर भारत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT