'मला देश सोडण्यास भाग पाडलं...'; पाकिस्तानात येताच नवाझ शरीफ यांचं शक्तीप्रदर्शन

Nawaz Sharif: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानात येताच मोठे शक्तीप्रदर्शन केले.
Former Prime Minister of Pakistan Nawaz Sharif
Former Prime Minister of Pakistan Nawaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

Former Prime Minister of Pakistan Nawaz Sharif: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानात येताच मोठे शक्तीप्रदर्शन केले. शनिवारी एका मोठ्या रॅलीला त्यांनी संबोधित केले. आपल्या भाषणात नवाझ शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तान येथे समर्थकांच्या मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना नवाझ शरीफ म्हणाले की, 'आजही त्यांना पाकिस्तानच्या लोकांकडून तितकेच प्रेम मिळत आहे, जेवढे चार वर्षांपूर्वी देश सोडल्यावर मिळत होते.' पीएमएल-एनच्या सुप्रिमोने त्यांच्या बहुप्रतिक्षित भाषणाची सुरुवात एका शेरने केली.

शरीफ म्हणाले की, “मी आज खूप वर्षांनी तुम्हाला भेटतोय, पण माझे तुमच्यासोबतचे प्रेमाचे नाते अजूनही तसेच आहे. या नात्यात कुठेही दुरावा आला नाही. मला तुमच्या डोळ्यात जे प्रेम दिसत आहे, त्याचा मला अभिमान आहे."

शरीफ पुढे म्हणाले की, त्यांनी कधीही त्यांच्या समर्थकांचा विश्वासघात केला नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या त्यागापासून दूर गेलो नाही. त्यांनी आपल्या आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर खोटे खटले कसे बनवले गेले याची आठवण करुन दिली. "पण कोणीही हार मानली नाही. पीएमएल-एन ध्वज."

Former Prime Minister of Pakistan Nawaz Sharif
Pakistan: नवाझ शरीफ यांचा 'वनवास' संपला, चार वर्षांनंतर पाकिस्तानात परतले, इम्रान खानचे भाकीत खरे ठरले!

नवाझ शरीफ पुढे म्हणाले की, “मला सांगा, नवाझ शरीफला त्यांच्या देशापासून वेगळे करणारे कोण आहेत? पाकिस्तानची (Pakistan) निर्मिती करणारे आपणच आहोत. आम्ही पाकिस्तानला अणुशक्ती बनवले. आम्ही लोडशेडिंग संपवले.'' आपल्या कार्यकाळात जनतेला स्वस्त वीज कशी दिली, यावरही त्यांनी भर दिला.

शरीफ पुढे असेही म्हणाले की, 'आज तुमचे प्रेम पाहून मी माझे सर्व दु:ख आणि वेदना विसरलो आहे. मला ते आठवण्याचीही इच्छा नाही. पण, काही जखमा अशा असतात ज्या कधीच भरुन येत नाहीत. पण माझं तुमच्याशी प्रेमाचं नातं तसंच आहे. या नात्यात कधीही दुरावा येणार नाही...'

Former Prime Minister of Pakistan Nawaz Sharif
Pakistan: पाकिस्तानातील गरिबांचे जगणे झाले कठीण, तस्कर पैशासांठी 1 कोटी रुपयांना विकतायेत किडनी!

दरम्यान, नवाझ शरीफ शनिवारी दुबईहून एका विशेष विमानाने ब्रिटनमध्ये चार वर्षांच्या स्वनिर्वासितानंतर मायदेशी परतले. जानेवारीमध्ये अपेक्षित असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी चौथ्यांदा सत्तेवर येण्यासाठी त्यांनी प्रण घेतला आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) प्रमुख शरीफ (73) हे दुबईहून स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता 'उमीद-ए-पाकिस्तान' या विशेष विमानाने इस्लामाबादला पोहोचले.

शरीफ यांच्या आगमनानंतर, त्यांची कायदेशीर सल्लागार टीमने भेट घेतली आणि न्यायालयाने 19 ऑक्टोबर रोजी मंजूर केलेल्या जामीन प्रक्रियेचा भाग म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयात (High Court) सादर करावयाच्या काही कायदेशीर कागदपत्रांवर त्यांनी सह्या केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com