Brazilian President Lula Da Silva Dainik Gomantak
ग्लोबल

G20 Summit: 580 दिवस तुरुंगवास भोगला, तिसऱ्यांदा बनले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष; भारतात येत आहेत लुला डी सिल्वा

G-20 शिखर परिषदेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून ब्रिटनच्या पंतप्रधानांपर्यंत जगातील विविध देशांचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Manish Jadhav

G20 Summit: राजधानी दिल्लीत G-20 ची शिखर परिषद सुरु होणार आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 शिखर परिषदेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून ब्रिटनच्या पंतप्रधानांपर्यंत जगातील विविध देशांचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी भारतही पूर्णपणे सज्ज आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती लुला प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत

G20 शिखर परिषदेसाठी पहिल्यांदाच भारताला (India) भेट देणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइझ इंसिओ लुला दा सिल्वा यांची नावे समाविष्ट आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जो बायडन प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत. व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, ते 7 सप्टेंबर रोजी दिल्लीला पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतील.

त्याचबरोबर, विक्रमी तिसऱ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर लुला पहिल्यांदाच भारताला भेट देणार आहेत. 2022 ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली आणि जानेवारी 2023 मध्ये राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

लुईझ इंसिओ लुला दा सिल्वा कोण आहे?

लुईझ इनासियो लुला दा सिल्वा हे ब्राझीलचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत.

लुला दा सिल्वा हे 2010 पासून दोनदा ब्राझीलचे लोकप्रिय अध्यक्ष राहिले आहेत.

जानेवारी 2023 मध्ये ते विक्रमी तिसऱ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बनले.

लुला दा सिल्वा हे कम्युनिस्ट नेते, पू्व फॅक्टी कामगार आणि ब्राझीलचे पहिले वर्किंग क्लास अध्यक्ष होते.

अत्यंत उजव्या विचारसरणीच्या जैर बोल्सोनारो यांचा पराभव करुन लुला यांनी ब्राझीलच्या राजकारणात पुनरागमन केले.

दा सिल्वा यांना 50. 9 टक्के तर जैर बोल्सोनारो यांना 49.1 टक्के मते मिळाली.

वडील मोची, गरिबीचे जीवन जगणारे

ब्राझीलचे (Brazil) राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तर-पूर्व ब्राझीलमधील केट्स येथे झाला.

एका मीडिया रिपोर्टनुसार, लुला यांचे बालपण अशा गरिबीत गेले की, त्यांना वयाच्या 7 व्या वर्षापर्यंत ब्रेड म्हणजे काय हे माहित नव्हते.

लुला दा सिल्वाचे वडील मोची होते.

राजकारणात एन्ट्री

1970 च्या दशकात लुला कामगार चळवळीत सामील झाले.

1980 मध्ये त्यांनी पार्टिडो डॉस ट्रॅबलहाडोरेस (PT)/वर्कर्स पार्टी, डाव्या विचारसरणीचा पक्ष स्थापन केला.

2002 मध्ये, लुला यांना ब्राझीलचे पहिले वर्किंग क्लास अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.

2010 मध्ये दोनदा अध्यक्षपद भूषवल्यानंतर लुला यांनी आपले पद सोडले.

आपल्या कार्यकाळात लुला यांनी लाखो ब्राझिलियन लोकांना गरिबीतून बाहेर काढले.

ब्राझीलचे तीन वेळा लोकशाही पद्धतीने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले लुला हे पहिले व्यक्ती आहेत.

भ्रष्टाचार प्रकरणी 580 तुरुंगवास भोगला

2018 मध्ये लुला यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात 580 दिवसांची तुरुंगवास भोगावा लागला होता.

दरम्यान, ते निवडणुकीपासून दूर राहिले.

वयाच्या 71व्या वर्षी तुरुंगवास भोगला, पण देशाचे राष्ट्रपती म्हणून परतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

SCROLL FOR NEXT