PM Modi America Visit: '...पंतप्रधान मोदी 'या' मशिदीला भेट देणार,' दाऊदी बोहरा समुदायाशी आहे खास कनेक्शन

PM Modi: परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, “पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरुन हा दौरा करत आहेत.”
PM Modi
PM ModiDainik Gomantak

PM Modi America Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ते 25 जून दरम्यान इजिप्तला भेट देणार आहेत, जिथे ते दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यावर आणि व्यवसाय आणि आर्थिक सहकार्याच्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर चर्चा करतील.

परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, “पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरुन हा दौरा करत आहेत.”

दरम्यान, अल-सिसी यांनी भारताच्या (India) प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींना इजिप्तला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधान म्हणून मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा असेल.

बोहरा समाजाच्या मदतीने नूतनीकरण केलेल्या अल हकीम मशिदीला पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. त्याचबरोबर, ते हेलिओपोलिस युद्ध स्मारकाला भेट देतील आणि शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील.

PM Modi
PM Modi America Visit: 'चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर...', पीएम मोदींचं रोखठोक मत

क्वात्रा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इजिप्त दौरा राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांच्या भारत दौऱ्याच्या सहा महिन्यांत होत आहे, यावरुन त्याचे महत्त्व दिसून येते. "आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान मोदींच्या इजिप्त (Egypt) दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना गती मिळेलच, शिवाय व्यापार आणि आर्थिक परस्परसंवादाच्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याचा विस्तारही होईल," असेही ते म्हणाले.

दुसरीकडे, दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि वन व पर्यावरण मंत्री इजिप्तला गेले होते. त्याचप्रमाणे इजिप्तचे तीन-चार मंत्रीही भारताच्या दौऱ्यावर आले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली. त्यांनी सांगितले की, सुएझ कालवा प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात आले आहे. पंतप्रधान मोदी गनमान्य मान्यवर, काही प्रमुख इजिप्शियन व्यक्ती आणि इजिप्तमधील भारतीय समुदायाशी संवाद साधतील.

PM Modi
PM Modi America Visit: 'पीएम मोदींचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी आम्ही...,' अमेरिकन खासदार म्हणाले; पाहा व्हिडिओ

तसेच, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावरुन परतल्यानंतर मार्चमध्ये स्थापन झालेल्या 'इंडिया युनिट'शी पंतप्रधान मोदी संवाद साधतील. या युनिटमध्ये अनेक उच्चस्तरीय मंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल सिसी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

यादरम्यान काही सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, मोदी आणि सीसी यांच्यातील चर्चेदरम्यान, द्विपक्षीय व्यापार सध्याच्या सुमारे 7 अब्ज डॉलरवरुन पुढील पाच वर्षांत 12 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

PM Modi
PM Modi US Visit: PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी भारतीयांचा उत्साह, वॉशिंग्टनसह अनेक शहरांमध्ये एकता रॅली, पाहा Video

शिवाय, भारत आणि इजिप्तमधील संरक्षण आणि धोरणात्मक संबंध गेल्या काही वर्षांत अधिक घट्ट झाले आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये दोन्ही देशांच्या सैन्याने पहिला संयुक्त सराव केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com