PM मोदी 6 सप्टेंबरला इंडोनेशियाला जाणार, आसियान शिखर परिषदेला लावणार हजेरी!

PM Modi: PM मोदींच्या या भेटीनंतर दोन दिवसांनी 9 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषद भारतात होणार आहे.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

ASEAN Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 आणि 7 सप्टेंबरला इंडोनेशियाला भेट देणार आहेत. PM मोदींच्या या भेटीनंतर दोन दिवसांनी 9 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषद भारतात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरुन 6 आणि 7 सप्टेंबर रोजी जकार्ताला भेट देतील, 20 व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला इंडोनेशियाने आसियानचे विद्यमान अध्यक्ष या नात्याने होस्ट केले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिली.

मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आगामी ASEAN-भारत शिखर परिषद 2022 मध्ये भारत-ASEAN संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढल्यानंतरची पहिली शिखर परिषद असेल. या परिषदेत भारत-आसियान संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. ही परिषद सहकाराच्या संदर्भात भविष्यातील दिशा ठरवणार आहे.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीहून UAE ला रवाना, नवीन अध्यक्षांची घेणार भेट

या भेटीत पंतप्रधान मोदी जकार्ता येथे आयोजित आसियान-संबंधित शिखर परिषदेत सहभागी होतील, जे प्रादेशिक सहकार्य आणि संवादासाठी भारताची वचनबद्धता दर्शवेल. पंतप्रधान मोदींची वर्षभरातील ही दुसरी इंडोनेशिया (Indonesia) भेट असेल.

यापूर्वी त्यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये बाली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत भाग घेतला होता. नवी दिल्ली 9 ते 10 सप्टेंबर या कालावधीत वार्षिक G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याच्या एक दिवस आधी ही भेट होणार आहे.

PM Modi
PM Modi's UAE Visit: फ्रान्सनंतर UAE मध्येही मोदींचे जल्लोषात स्वागत, बुर्ज खलिफावर झळकला तिरंगा Watch video

गेल्या वर्षी, भारताचे (India) उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी कंबोडियातील भारत-आसियान शिखर परिषद आणि इतर संबंधित शिखर परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या देशांसोबतचे भारताचे सहकार्य सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी (CSP) च्या पातळीवर नेल्यामुळे ही शिखर परिषद महत्त्वपूर्ण वळण देणारी ठरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com