NASA Alert about Glacier: Dainik Gomantak
ग्लोबल

NASA Alert about Glacier: ...तर लंडनपेक्षा दुप्पट आकाराचा हिमखंड बुडणार; 'नासा'ने दिला इशारा

135 किलोमीटर लांब आणि 26 किलोमीटर रूंद आकार

गोमन्तक डिजिटल टीम

NASA Alert about Glacier: इजिप्तमध्ये एकीकडे संयुक्त राष्ट्राचे जलवायु परिवर्तन परिषद सुरू असताना अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा) ने एक सर्वात मोठा हिमखंड समुद्रात कोसळू शकतो, अशी भीती वर्तवली आहे. Antarctic Iceberg A-76A असे या हिमखंडाचे नाव आहे.

नासाने एक उपग्रह छायाचित्र जारी केले आहे. यात अंटार्क्टिका खंडातील सर्वात मोठा हिमखंड लवकरच समुद्रात सामावून जाईल, असे दिसत आहे. नासाच्या माहितीनुसार हा हिमखंड वितळून समुद्रात विरघळून जाईल.

यूएस नॅशनल आईस सेंटरच्या माहितीनुसार हा हिमखंड 135 किलोमीटर लांब आणि 26 किलोमीटर रूंद आहे. म्हणजेच इंग्लंडची राजधानी लंडनपेक्षा जवळपास दुप्पट आकाराचा हिमखंड आहे. ग्लेशियर रोड आयलँडमधील हा सर्वात मोठा भाग आहे. पुर्वी हा जगातील सर्वात मोठा हिमखंड होता. मे 2021 मध्ये अंटार्क्टिका येथे रोन आईस शेल्फच्या पश्चिमेकडील भाग तुटला हगोता त्यानंतर हा हिमखंड 76A, 76B , आणि 76C अशा तीन भागात विभाजीत झाला. 76A हा सर्वात मोठा तुकडा आहे.

लाईव्ह सायन्सच्या माहितीनुसार हा हिमखंड अंर्टाक्टिकासमवेत हळूहळू वाहत चालला होता. पण आता त्याचा वितळण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे एकप्रकारे या हिमखंडाचा अंतिम प्रवासच सुरू झाला आहे. 31 ऑक्टोबर रोजी नासाच्या टेरा या उपग्रहाने हा फोटो काढला होता. सध्या हा हिमखंड दक्षिण आफ्रिकेच्या केप हॉर्न आणि दक्षिण शेटलँड यांच्या मध्ये पॅसिफिक आणि अटलांटिक महासागराला जोडणाऱ्या एका आखातात तरंगत आहे. नासाच्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने हा फोटो 4 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन प्रकाशित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

SCROLL FOR NEXT