lieutenant general Nadeem Ahmed Anjum Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानी लष्करापुढे झुकले इम्रान खान! ISI चे नवे प्रमुख बनले नदीम अहमद अंजुम

अंजुम (Nadeem Ahmed Anjum) 20 नोव्हेंबर पासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची कमान सांभाळतील.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम (lieutenant general Nadeem Ahmed Anjum) यांची इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. अंजुम 20 नोव्हेंबर पासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची कमान सांभाळतील. विशेष म्हणजे, पाकिस्तानी लष्कराने (Pakistan Army) 6 ऑक्टोबर रोजी एक निवेदन जारी करत विद्यमान ISI प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या जागी अंजुम यांची नियुक्ती जाहीर केली. त्यामुळे इम्रान खान यांना अंजुम यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करावा लागेल, असे मानले जात होते.

त्याचबरोबर अंजुम 20 नोव्हेंबरपासून आयएसआयची कमान सांभाळणार आहेत. दुसरीकडे, सध्याचे आयएसआय प्रमुख फैज हमीद (Faiz Hameed) 19 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या पदावर राहणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून औपचारिक घोषणा जारी करण्यात आली. परंतु ऑक्टोबरमध्ये, पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अंजुम यांची नियुक्ती जाहीर केली. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या घोषणेनंतर इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात मतभेद असल्याची अटकळ बांधली जात होती.

इम्रान सरकारला धोका निर्माण झाला

देशाच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित बाबींमध्ये पाकिस्तानी लष्कर महत्त्वाचे निर्णय घेत असल्याचे कुणापासून लपून राहिलेले नाही. पाकिस्तानी लष्कर आणि इम्रान सरकार यांच्यात काही "तांत्रिक समस्या" असल्याचे इम्रान खान यांच्या कार्यालयाने मान्य केले. हे प्रश्न लवकरच सोडवले जातील, असे सांगितले होते. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी याबाबत माहिती दिली होती. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे लष्कराने इम्रान सरकारशी तडजोड न करण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांच्या सरकारमध्ये उच्च स्तरापर्यंत बदल दिसून आले असते.

बाजवा आणि इम्रान यांची आयएसआय प्रमुखासंदर्भात बैठक झाली

इस्लामाबादमधील पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इम्रान खान यांनी 20 नोव्हेंबरपासून आयएसआयचे महासंचालक म्हणून अंजुम यांची नियुक्तीला मंजूरी दिली. सध्याचे आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद हे 19 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या पदावर राहतील, असे त्यात म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाने पुष्टी केली की, पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यात आधी झालेल्या बैठकीत, आयएसआयमधील कमांड बदलण्याची वेळ आणि नवीन डीजी आयएसआयच्या निवडीची वेळ यावर चर्चा झाली होती. तसेच अशीही माहिती आहे की, इम्रान खान यांनी तीन नावे सुचली होती, मात्र त्यांना अंजुम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT