Myanmar Military Dainik Gomantak
ग्लोबल

Myanmar: म्यानमारमध्ये बंडखोर गटाच्या कार्यक्रमावर लष्कराचा हल्ला, 30 जण ठार

Myanmar Military Attack: म्यानमारच्या मध्य भागात मंगळवारी (11 एप्रिल) लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर लष्कराने हल्ला केला आहे.

Manish Jadhav

Myanmar Military Attack: म्यानमारच्या मध्य भागात मंगळवारी (11 एप्रिल) लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर लष्कराने हल्ला केला. या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

सागिंग प्रदेशातील रहिवाशांचा हवाला देत, बीबीसी बर्मीज, रेडिओ फ्री एशिया (आरएफए) आणि इरावदी न्यूज पोर्टलने या हल्ल्यात नागरिकांसह 50 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे.

तथापि, रॉयटर्स या घटनेची पडताळणी करु शकले नाही, कारण सत्ताधारी सैन्याच्या प्रवक्त्याने फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही. पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) च्या सदस्याने, जे जंटाचा विरोध करते, रॉयटर्सला सांगितले की, त्यांच्या स्थानिक कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात लष्कराने हल्ला केला.

पीडीएफ सदस्यांचे काय म्हणणे आहे?

पीडीएफ सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "आतापर्यंत, मृतांचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही" म्यानमारच्या सैन्याने 1 फेब्रुवारी 2021 रोजी आंग सान स्यू की (Aung San Suu Kyi) यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता हस्तगत केली.

यानंतर, त्यांना आणि त्यांच्या सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. याविरोधात अनेक आंदोलने झाली आणि 2 हजारांहून अधिक नागरिकांचा (Citizens) मृत्यू झाला. या लष्करी कारवाईमुळे देशातील बहुतांश भागातील लोकांना शस्त्रे उचलण्यास भाग पाडले.

तसेच, दोन वर्षांपूर्वी लष्कराने म्यानमारमधील लोकशाहीवादी सरकार उलथवून लावले. यासह, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी आता म्यानमारच्या जनतेला लोकशाहीसाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘एका रातीन आनी एका वातीन, माका देऊळ बांधून जाय’! शेकडो वर्षांची परंपरा असलेली पेडण्याची 'पुनाव'

Supreme Court On Cricket: 'क्रिकेट' आता खेळ नाही, केवळ व्यवसाय! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

SCROLL FOR NEXT