Sheikh Mohammed bin Rashid Al-Maktoum and Princess Haya

 

Dainik Gomantak

ग्लोबल

Most Expensive Divorce: दुबईचे किंग रशीद यांना पत्नीला द्यावे लागणार 5500 कोटी रुपये

राजकुमारी हया शेख मोहम्मद यांची सहावी पत्नी आहे. तीने ऑक्सफर्डमधून राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले.

दैनिक गोमन्तक

दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांनी त्यांची पत्नी राजकुमारी हया (Princess Haya) हिला घटस्फोट (Divorce) दिला आहे. त्या बदल्यात, त्यांना राजकुमारी हयाला सुमारे 5500 कोटी रुपये (554 दशलक्ष पौंड) द्यावे लागणार आहे.

ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने (Dubai Court) किंग शेख मोहम्मद यांना घटस्फोटासाठी राजकुमारी हयाला सुमारे 5500 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. घटस्फोटाचा निपटारा आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी राजाला ही रक्कम द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. हि सेटलमेंट ब्रिटिश कायदेशीर इतिहासातील सर्वात मोठ्या सेटलमेंटपैकी एक आहे. राजकुमारी हया ही जॉर्डनचे माजी राजे हुसेन यांची मुलगी आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश फिलिप मूर यांनी आपल्या निर्णयात सांगितले की, राजकुमारी हया आणि तिच्या मुलांना दहशतवाद किंवा अपहरण यांसारख्या धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. ब्रिटनमध्ये त्यांना विशेष संरक्षणाची आवश्यकता असेल.

राजकुमारीला मिळणार 2500 कोटी रुपये

वकिलांच्या म्हणण्यानुसार, शेख यांनी दिलेल्या रकमेपैकी 2500कोटी रुपये (251.5 दशलक्ष पौंड) राजकुमारी हयाला एकरकमी दिले जातील. त्यांच्या दोन्ही मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी 2900 कोटी रुपये बँकेत सुरक्षितता म्हणून ठेवले जातील. याशिवाय मुले मोठी झाल्यावर दरवर्षी 112 कोटी रुपये द्यावे लागतील. या सेटलमेंटसाठी राजकुमारी हयाने 14 हजार कोटी रुपये मागितले होते. अपील होण्याची शक्यता नाही. कायदेतज्ज्ञांच्या मते, राज्यकर्त्यांकडून अपील करणे फार कठीण आहे.

कोण आहे राजकुमारी हया

राजकुमारी हया शेख मोहम्मद यांची सहावी पत्नी आहे. तीने ऑक्सफर्डमधून राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. तीने 2004 मध्ये दुबईचे किंग शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्याशी लग्न केले. 2019 मध्ये ती अचानक दुबई सोडून इंग्लंडला गेली. यानंतर तिने पतीवर अनेक आरोप केले. राजकन्येने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते.

दुबईच्या राजघराण्याची राजकुमारी चर्चेत

राजकुमारी हयाच्याआधी दुबईच्या राजघराण्याची (Dubai royal family) मुलगी राजकुमारी लतीफाही चर्चेत होती. तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तीने शेख मोहम्मद यांच्यावर दुबईतील महिलांच्या स्थितीबाबत अनेक आरोप केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT