Rajesh Bhushan Dainik Gomantak
ग्लोबल

Covid19: मृत्यूदरात घट पण, 6 राज्य चिंतेत; राजेश भूषण

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत आढळले कोरोनाचे 18,554 नवीन रुग्ण

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. दरम्यान, आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, जगात कोरोना रूग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आशियामध्ये गेल्या 4 आठवड्यांपासून 7.9 टक्क्यांवरून 18.4 टक्क्यांपर्यंत कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. भारतातही कोरोनाच्या (Covid19) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सचिव राजेश भूषण म्हणाले की, "महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, यूपी, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान या 10 राज्यांमध्ये सर्वात जास्त कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.(India Corna Updates)

केरळमध्ये पाजिटिविटी (Covid Positive)दर हा 32 टक्के आहे. दिल्लीत पाजिटिविटीचा दर ३० टक्के, उत्तर प्रदेशमध्ये तो 6 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशात अशी 11 राज्ये आहेत जिथे 50 हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत, तर 13 राज्यांमध्ये 10 ते 50 हजार दरम्याण कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत, तिसऱ्या लाटेतील सक्रिय रुग्णांच्या तुलनेत मृतांची संख्या खूप कमी झाली आहे. दुसर्‍या लाटेत लसीकरणाची लोकसंख्या 2 टक्के होती, आता ती तिसर्‍या लाटेत लसीकरण झालेल्या लोकसंख्येच्या 72 टक्के आहे.

राजेश भूषण (Rajesh Bhushan)म्हणाले की, सध्या जगात कोरोनाची चौथी लाट पाहायला मिळत आहे, गेल्या 1 आठवड्यात दररोज 29 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. आफ्रिकेतील (Africa) कोविड रुग्णांची संख्या 4 आठवड्यांत कमी झाली तर आशियामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढली आहेत. युरोपमध्येही केसेस कमी होत आहे.

राजेश भूषण म्हणाले की, गेल्या 4 दिवसांत दैनंदिन कोविड चाचणीत सातत्याने वाढ करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात सुमारे 19 लाख चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्रातील साप्ताहिक पाजिटिविटी रेट 2 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर पोहोचला आहे तर कर्नाटकातील पाजिटिविटी रेट 4 आठवड्यांपूर्वी 0.5 टक्के होता जो आता 15 टक्के झाला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18554 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 19,328 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT