Morocco Earthquake Twitter
ग्लोबल

Morocco Earthquake: मोरोक्को भूकंप! मृतांचा आकडा एक हजार पार, अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक

मध्य मोरोक्कोमध्ये देशातील चौथे सर्वात मोठे शहर असलेल्या माराकेशमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला

गोमन्तक डिजिटल टीम

Morocco Earthquake: मोरोक्कोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपांत मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 1,037 एवढी झाली असून, 1,200 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अलजजीराने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मध्य मोरोक्कोमध्ये देशातील चौथे सर्वात मोठे शहर असलेल्या माराकेशमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर विविध शहरांमधील लोक धावत रस्त्यावर आले.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, स्थानिक वेळेनुसार काल रात्री 11.11 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 71 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाय अॅटलस पर्वतांमध्ये जमिनीपासून 18.5 किलोमीटर खाली होता.

भूकंपानंतर 19 मिनिटांनी 4.9 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला. माराकेश आणि दक्षिणेकडील अनेक भागात भूकंपामुळे अधिक मृत्यू झाले आहेत.

"प्रारंभिक अहवालांनुसार, भूकंपामुळे अल-हौज, माराकेश, ओअरझाझेट, अझिलाल, चिचौआ आणि तरौदान प्रांतांमध्ये जीवितहानी झाली आहे." असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मोरोक्को गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, या भूकंपामुळे शहराबाहेरील जुन्या वस्त्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर यासंबंधीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत, यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग बनताना दिसत आहेत.

विशेषतः माराकेशमध्ये ज्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. येथील अनेक पर्यटकांनी भूकंपानंतर जीव वाचवण्यासाठी लोक धावताना आणि ओरडतानाचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत.

भारताचे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मोरोक्कोमध्ये झालेल्या भीषण भूकंपात झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि या कठीण काळात भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT