Bomb blast File Photo Dainik Gomantak
ग्लोबल

Nigeria Bomb Blast: नायजेरियातील बॉम्बस्फोटात 50 हून अधिक मेंढपाळ ठार

स्फोटानंतर तणाव; अनेकांची प्रकृती चिंताजनक

Akshay Nirmale

Nigeria Bomb Blast: आफ्रिका खंडातील नायजेरिया या देशामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तब्बल 50 हून अधिक मेंढपाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण या स्फोटात जखमी झाले आहेत. स्फोटातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

मंगळवारी रात्री उत्तर मध्य नायजेरियातील नसारावा आणि बेनु राज्यांदरम्यान घडली. हा प्रदेश आधीपासून जातीय आणि धार्मिक तणावासाठी कुप्रसिद्ध आहे. मध्य नायजेरियामध्ये वांशिक सूडाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बॉम्बस्फोट झालेल्या परिसरातून नेहमी हिंसाचाराच्या घटना घडत असतात.

मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यातील संघर्षातून येथे अनेकदा हाणामारीची प्रकरणे घडत असतात. हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा मेंढपाळ आणि त्यांची जनावरे नसरवा आणि बेन्यू या राज्यांच्या सीमेवरील रुकुबी या गावात होते. तिथेच हा बॉम्बस्फोट झाला.

नायजेरियाच्या मियाती अल्लाह कॅटल ब्रीडर्स असोसिएशनचे प्रवक्ता तसीउ सुलेमान यांनी सांगितले की, फुलानी समाजातील मेंढपाळांचा एक समुह त्यांच्या जनावरांसमवेत बेन्यू येथून नसरवाकडे जात होता. तेव्हा हा स्फोट झाला. या स्फोटात किमान 54 मेंढपाळांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बॉम्बस्फोटामागे कोण आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. सुरक्षा यंत्रणांच्या बैठका सातत्यने सुरू आहेत. या घटनेनंतर स्थानिक पातळीवरील तणाव कमी करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत.

या स्फोटात अनेकांचा जळून मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायी आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. सुरक्षा यंत्रणा या बॉम्बस्फोटाच्या तपासात गुंतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway: कोल्हापूरला वगळलं; शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनासाठी सरकारकडून आदेश जारी

Monthly Numerology Prediction September 2025: सप्टेंबर महिन्यात मूलांक 1 ते 7 पर्यंतच्या लोकांचे नशीब उजळणार, मोठा धनलाभ होणार; मान-सन्मान वाढणार!

गोव्याच्या गणेशोत्सवात रमली अभिनेत्री समीरा रेड्डी; फोटो शेअर करत म्हणाली, 'ही नवी सुरुवात...'

Viral Video: अटारी बॉर्डरवर पाकड्यांची 'पोलखोल'! पाकिस्तानच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य, तर भारताची बाजू स्वच्छ; पावसाचा व्हिडिओ व्हायरल

Goa Film Shooting: फिल्म इंडस्ट्रीला सावंत सरकारचं 'गिफ्ट', गोव्यातील शूटिंगसाठी आता सिंगल-विंडो सिस्टिम; वेळ आणि पैशाची होणार बचत

SCROLL FOR NEXT