मोठी बातमी! तब्बल 12 वर्षांनी पाकचे पंतप्रधान भारतात येणार? गोव्यात होणार बैठक

भारत देणार निमंत्रण; 2011 मध्ये तत्कालीन मंत्री हिना रब्बानी खार आल्या होत्या भारत दौऱ्यावर
SCO Meet | Shahbaz Sharif | Narendra Modi
SCO Meet | Shahbaz Sharif | Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत भारत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आमंत्रित करणार आहे. बुधवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांना गोव्यात होणाऱ्या SCO शिखर परिषदेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. (SCO Meet In Goa)

संबंधित बातमीत म्हटले आहे की, प्रोटोकॉलनुसार आमंत्रणे पाठवण्यात आली होती, परंतु बिलावल भुट्टो आणि किन गँग या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत किंवा नाही, याची माहिती मिळालेली नाही.

जर पाकिस्तानचे पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्री यांनी या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे ठरवले तर 2011 नंतर पाकिस्तानी पंतप्रधान किंवा मंत्र्याने भारतात केलेला हा पहिला दौरा ठरेल. 2011 साली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार या भारतात आल्या होत्या.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे, दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांत तणाव निर्माण झाला.

ऑगस्ट 2019 मध्ये भारताने जम्मू आणि काश्मीर या राज्यातील विशेष अधिकार कमी केले. राज्याची दोन केंद्रशासित विभागात विभागणी केली. त्यानंतरही पाकिस्तानने याबाबत नाराजीचा सूर लावला होता. या कारणांवरून भारत-पाकिस्तानातीलस संबंधांत गोडवा राहिला नव्हता.

शांघाय सहकार्य संघटना (SCO) या आठ देशांच्या संघटनेचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. या संघटनेत चीन, भारत, कझाकिस्तान, किरगिझस्तान रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. इतर मध्य आशियाई देशांसह चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

SCO तील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक या वर्षाच्या अखेरीस गोव्यात होण्याची शक्यता आहे. भारताने गेल्या सप्टेंबरमध्ये या गटाचे अध्यक्षपद स्वीकारले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात प्रमुख मंत्रिस्तरीय बैठका आणि शिखर परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com