Monkeypox Dainik Gomantak
ग्लोबल

France मध्ये मंकीपॉक्सचा विस्फोट, 1700 रुग्ण आढळले; 'समलैंगिक रुग्णांची संख्या अधिक'

दैनिक गोमन्तक

France: भारतात मंकीपॉक्सचे 4 रुग्ण आढळल्यानंतर सरकार सतर्क झाले आहे. आतापर्यंत देशभरात खबरदारीचा उपाय म्हणून 15 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विमानतळांवरही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे.

दरम्यान, फ्रान्समध्ये मंकीपॉक्सचा (Monkeypox) विस्फोट झाला आहे. इथे आतापर्यंत एकूण 1,700 रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्सचे आरोग्य मंत्री फ्रान्सिस ब्राउन यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. ब्राऊन म्हणाले की, 'देशात मंकीपॉक्ससाठी 100 लसीकरण (Vaccination) केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. याद्वारे आतापर्यंत 6,000 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.' मंत्र्यांनी आवाहन केले आहे की, 'जर कोणाला मंकीपॉक्सची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी शक्य तितक्या लवकर स्वत:ला इतरांपासून वेगळे करावे.'

त्याचबरोबर, देशात मंकीपॉक्सबाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे मंत्री महोदयांनी मान्य केले आहे. परंतु घाबरण्याची काही एक गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य नागरिकांना काळजी करण्याची गरज नसून सरकार (Government) लसीकरण कसे वाढवता येईल यावर भर देत असल्याचेही ते म्हणाले.

दुसरीकडे, बीएफएम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ''आतापर्यंत मला आढळलेले बहुतांश रुग्ण हे समलिंगी आहेत. त्यांचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध आहेत. परंतु या लोकांच्या संपर्कात आलेले इतर लोकही मंकीपॉक्सचे बळी ठरु शकतात. म्हणूनच मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्यांनी स्वतःला वेगळे केले पाहिजे.''

तसेच, फ्रान्समध्ये मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण पॅरिस आणि त्याच्या आसपासच्या भागात आहेत. लवकरच पॅरिसमधील लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा वाढता धोका पाहता हेल्थ इमर्जन्सी घोषित केली आहे.

शिवाय, आत्तापर्यंत जगातील 75 देशांमध्ये मंकीपॉक्सचे एकूण 16 हजार रुग्ण आढळून आले आहेत. एवढेच नाही तर आफ्रिकेतही या विषाणूने ग्रस्त असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT