Monkeypox: मंकीपॉक्सपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

मंकीपॉक्सच्या रुग्णामुळे देशात पुन्हा चिंतेचे वातावरण
Monkeypox Symptoms & Precautions
Monkeypox Symptoms & PrecautionsDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात आढळलेल्या पहिल्या मंकीपॉक्सच्या रुग्णामुळे देशात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे आणि हा आजार रोखण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब केल्याचे दिसून येते. देशातील कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही आणि याच दरम्यान तापाशी संबंधित आणखी एक नवीन आजार समोर आला आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून केरळला परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

भारतातील पहिल्या मंकीपॉक्सच्या प्रकरणामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि सरकारने हा आजार रोखण्यासाठी उपाययोजनांचा अवलंब केला आहे आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले जात आहे. कोरोना महामारीनंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मंकीपॉक्स विषाणूमुळे होणाऱ्या गंभीरतेबद्दल माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की, या आजारामध्ये त्वचा संक्रमण, न्यूमोनिया, भ्रम आणि डोळ्यांच्या समस्यांचा समावेश आहे. मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणे ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, लिम्फ नोड्स सुजणे, थंडी वाजणे आणि थकवा येणे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठतात आणि याची सुरुवात चेहऱ्यापासून होते, जी सहसा संसर्ग झाल्यानंतर ६-१३ दिवसांनंतर दिसू लागते.

मंकीपॉक्स हा विषाणू कसा पसरतो?

मंकीपॉक्स रोगाचा विषाणू ‘फ्लेविविरिडे विषाणू’तून येतो आणि हा रोग माकडांपासून मानवांमध्ये पसरू शकतो. मंकीपॉक्स बाधित व्यक्ती कायसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे, ज्याला ‘मंकी फिव्हर’ असे म्हणतात. मंकीपॉक्स हा प्राण्यापासून माणसात आणि नंतर माणसापासून माणसात पसरू शकतो.

Monkeypox Symptoms & Precautions
केरळमध्ये आढळला Monkeypox चा देशातील पहिला रुग्ण; हाय लेवल टीम सतर्क

मंकीपॉक्सपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

1) अलीकडेच व्हायरसचे निदान झालेल्या किंवा ज्यांना संसर्ग झाला असेल अशा लोकांच्या संपर्कात येणे टाळा.

2) जर तुम्ही लक्षणे असलेल्या एखाद्याच्या जवळच्या संपर्कात असाल तर फेस मास्क घाला.

3) शारीरिक संबंध ठेवल्यास कंडोमचा वापर करावा.

4) व्हायरस वाहून नेणाऱ्या प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळा.

5) आजारी किंवा मृत प्राणी आणि विशेषत: ज्यांना संसर्गाचा इतिहास आहे, जसे की माकडे, उंदीर आणि कुत्रे यांचा समावेश आहे.

6) आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवा किंवा अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा.

7) पुष्टी किंवा संशयित मंकीपॉक्स संसर्ग असलेल्या रूग्णांची काळजी घेताना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरा.

8) फक्त पूर्णपणे शिजवलेले मांस खा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com