Patient
PatientDainik Gomantak

Monkeypox ने वाढवले टेन्शन, WHO ने घोषित केली जागतिक आरोग्य आणीबाणी

WHO: जगभरातील मंकिपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे.
Published on

WHO High Alert Over Monkeypox: जगभरातील मंकिपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे. शनिवारी WHO ने मंकीपॉक्सबाबत हाय अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे, भारतात आतापर्यंत तीन रुग्णांची पुष्टी झाली आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

मंकीपॉक्सचा प्रसार मे महिन्यात सुरु झाला

मे महिन्याच्या सुरुवातीपासून मंकीपॉक्सचा (Monkeypox) प्रसार वेगाने झाला. WHO ने सांगितले की, 'सध्या अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव आहे. या रोगाचा प्रसार त्या देशांमध्ये देखील होत आहे, जिथे हा रोग सहसा आढळला नव्हता.'

Patient
MonkeyPox: देशाची चिंता वाढली! केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण

WHO च्या सर्वोच्च सतर्कतेचा अर्थ

जागतिक आरोग्य संघटनेने वाढत्या मांकीपॉक्सच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या विषाणूबाबत जगभरातील नागरिकांना (Citizens) जागतिक आरोग्य संघटनेने सतर्क केले आहे. डब्ल्यूएचओ आता मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव हा जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर धोका म्हणून पाहत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसादाची गरज आहे. जेणेकरुन रोगाचा प्रसार थोपावता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com