Alison Kay Bowles Dainik Gomantak
ग्लोबल

OMG: अंगावरील 'तिळा' ने वाचवले लोकप्रिय मॉडेलचे प्राण! वाचा संपूर्ण कहाणी

शरीरावर असलेले तीळ हे आतापर्यंत सौंदर्याचे प्रतीक मानले जात होते.

दैनिक गोमन्तक

शरीरावर असलेले तीळ हे आतापर्यंत सौंदर्याचे प्रतीक मानले जात होते. एखाद्या सुंदर स्त्री किंवा मुलीच्या शरीरावर असलेला 'तीळ' तिचाही जीव वाचवेल. ही आश्चर्यकारक गोष्ट तुम्ही पूर्वी ऐकली नसेल. परंतु ही गोष्ट खरी आहे. शरीरावरील तीळाने एका सुंदर मॉडेलचा जीव वाचवला. ही जगातील एक प्रसिद्ध मॉडेल आहे. जिचे इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एवढंच नाही तर 'फोर्ब्स' च्या यादीतही तिचा उल्लेख आलेला आहे. (Moles Saved Model Life Got Early Treatment Of Cancer)

दरम्यान, अ‍ॅलिसन के बाउल्स (Alison Kay Bowles) असे तिचे नाव आहे. ही मॉडेल मूळची फ्लोरिडा, अमेरिकेचे (America) आहे. वास्तविक, अ‍ॅलिसनच्या शरीरावर काळे तीळ मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे लोक तिच्यावर सतत कमेंट करायचे. ज्यांना अ‍ॅलिसन अनेकदा उघडपणे उत्तर देण्यास घाबरत होती. यापूर्वी, अ‍ॅलिसनच्या एका मैत्रिणीने तिला सावध केले होते की, तिच्या शरीरावर मुबलक प्रमाणात काळे तीळ आहेत. अशा परिस्थितीत तिने तिला अत्यंत सावध राहण्यास सांगितले होते. त्याच वेळी, मैत्रिणीने इशाराही दिला होता की, जर तीळाचा आकार अचानक वाढू लागला आणि तीळ रंग बदलू लागला तर थेट डॉक्टरांशी संपर्क साध.

तिळाच्या बायोप्सीने कर्करोगाचे रहस्य उलगडले

अ‍ॅलिसनने त्यावेळी तिच्या मैत्रिणीच्या त्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. मात्र मैत्रिणीची गोष्ट ध्यानात ठेवून ती तिच्या अंगावरील तीळांवर लक्ष ठेवू लागली. काही दिवसांपूर्वी, अ‍ॅलिसनच्या लक्षात आले की, आपल्या शरीरावरील एका तीळाचा आकार आणि रंग अचानक बदलू लागला आहे. म्हणून तिने थेट कर्करोग तज्ञाशी (त्वचा तज्ञ) चर्चा केली. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तिने बायोप्सी करुन घेतली. मात्र बायोप्सीनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. तिळाच्या आत कॅन्सरचा आजार सुरु झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. यासंबंधीची माहिती मिळताच तिने तिच्या मैत्रिण मेलेनोमाचे आभार मानले, जिने तिला काही महिन्यांपूर्वी तिळापासून उद्भवणाऱ्या कॅन्सरपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता.

इन्स्टाग्रामवर सतत चर्चेत

सध्या आपल्या मैत्रिणीच्या सल्ल्याने सावध झालेल्या या प्रसिद्ध अमेरिकन मॉडेलने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून स्वतःला वाचवले. अशाप्रकारे अ‍ॅलिसन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. याशिवाय ती 'फोर्ब्स' सारख्या जगातील प्रसिद्ध मासिकाचाही एक भाग बनली आहे. ही तीच अमेरिकन मॉडेल अ‍ॅलिसन आहे, जी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सध्या तिचे इन्स्टाग्रामसारख्या (Instagram) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दिसायला सुंदर असणाऱ्या अ‍ॅलिसनने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन ही गोष्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT