OMG! म्हाताऱ्या उंदराला तरुण बनवण्यात शास्त्रज्ञांना यश, हे तंत्र आले कामी

म्हातारा उंदीर (Rat) तरुण होऊ शकतो का?
Rat
RatDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: म्हातारा उंदीर तरुण होऊ शकतो का? हे ऐकून तुम्हाला थोडं अजब वाटलं असेल ना. परंतु शास्त्रज्ञांनी ते शक्य करुन दाखवलं आहे. होय, हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे शक्य झालं आहे.

दरम्यान, शास्त्रज्ञांनी (Scientists) ज्या प्रकारे म्हाताऱ्या उंदराला तरुण बनवले आहे, ते आणखी आश्चर्यकारक आहे. उंदरांच्या विष्ठेमुळे शास्त्रज्ञांनी हे शक्य करुन दाखवलं आहे. वास्तविक, शास्त्रज्ञांनी तरुण उंदरांच्या विष्ठेचे म्हाताऱ्या उंदरांमध्ये प्रत्यारोपण केले. हे सर्व संशोधनावर आधारित होते. यामुळे म्हातारा उंदीर तरुण झाला. तरुण उंदरांपासून म्हाताऱ्या उंदरांमध्ये विष्ठेच्या सूक्ष्मजंतूंचे प्रत्यारोपण केल्याने म्हाताऱ्या उंदरांची आतडे, मेंदू आणि डोळे तरुण उंदरांसारखेच बनले, म्हणजेच त्याची क्षमता वाढली. शास्त्रज्ञ विष्ठेतून सूक्ष्मजंतूंचे आतड्यात प्रत्यारोपण करतात.

Rat
चीन समर्थक हाँगकाँग निवडणूक समितीचे जॉन ली बनले नवे CEO

तसेच, एवढंच नाही तर म्हाताऱ्या उंदराच्या विष्ठेचे सूक्ष्मजंतू तरुण उंदरामध्ये प्रत्यारोपित केले, असता तरुण उंदरामध्ये वृद्धांसारखी लक्षणे आढळून आली. त्याची दृष्टी खालावली आणि मेंदूला सूज आली. तथापि, हा तरुण होण्याचा हा मार्ग नाही. किंबहुना, प्राणी जसजसे मोठे होतात, वय वाढते, तसतसे शरीर कमजोर होते. आतडे पूर्वीप्रमाणे काम करु शकत नाहीत. मात्र, यातून हे निश्चितपणे स्पष्ट होते की, आतडे मजबूत ठेवल्यास तुमची शारीरिक क्षमता दीर्घकाळ मजबूत राहू शकते. मात्र, शाज्ञस्त्रांनी याची चाचणी केवळ उंदरांच्या आतड्यावरच केली. जर तरुण उंदराची विष्ठा वृद्ध उंदरामध्ये प्रत्यारोपित केली गेली तर क्षमता वाढले.

दुसरीकडे, हे संशोधन (Research) मायक्रोबायोममध्ये प्रकाशित झाले आहे. आतड्याच्या मायक्रोबायोटामधील बदल वय-संबंधित रोग आणि शारीरिक क्षमतेवर परिणाम करत असल्याचे दिसून आले. तसेच, त्याची अधिक आणि स्पष्ट दृष्टी मेंदू आणि डोळयातील पडदऱ्यावर पहिल्यांदा दिसून आली. जेव्हा शास्त्रज्ञांनी तरुण उंदरांच्या विष्ठेचे सूक्ष्मजंतू म्हाताऱ्या उंदरांमध्ये प्रत्यारोपित केले तेव्हा त्याच्या मेंदूची सूज संपली.

Rat
हाँगकाँग निवडणूक पुढे ढकलणे बेकायदा

त्याच वेळी, जेव्हा ही प्रक्रिया उलट झाली, म्हणजे म्हाताऱ्या उंदराचे सूक्ष्मजंतू तरुण उंदरामध्ये प्रत्यारोपित केले गेले, तेव्हा त्यात वृद्धत्वाची लक्षणे दिसून आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com