"Kill us but there's no going back..." Indian father-leka who entered Pakistan illegally refused to leave the country. Dainik Gomantak
ग्लोबल

"आम्हाला ठार मारा पण परत जाणार नाही..." अवैधपणे पाकिस्तानात घुसलेल्या भारतीय बाप-लेकाचा देश सोडण्यास नकार

आपल्या भावी पिढ्यांना पाकिस्तानात पाहण्याचे आपले स्वप्न असल्याचे हसनैन यांनी सांगितले. त्यांनी पाकिस्तानात उदरनिर्वाहासाठी नोकरीही मागितली आहे.

Ashutosh Masgaunde

Mohammad Hasnain and his son Ishaq Ameer seeking asylum in Pakistan:

नवी दिल्लीतील गौतमपुरी येथील रहिवासी असलेले भारतातील पिता-पुत्र, अफगाणिस्तान सीमेवरून पाकिस्तानात पोहोचले आहेत. 70 वर्षीय मोहम्मद हसनैन आणि त्यांचा 31 वर्षांचा मुलगा इशाक अमीर प्रथम दिल्लीहून यूएईला पोहोचले आणि नंतर अफगाणिस्तानला गेले. अफगाणिस्तानातून हे पिता-पुत्र कंदहार सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाले.

पाकिस्तानस्थित वृत्तवाहिनीने जिओ न्यूजशी बोलताना मोहम्मद हसनैन यांनी सांगितले की, "पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आम्हाला भारतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे."

जेव्हा पत्रकाराने त्यांना विचारले की पाकिस्तान सरकारने त्यांना भारतात परत पाठवले तर काय होईल, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "हे मला मान्य नाही. तुम्ही मला मारू शकता किंवा मला गोळ्या घालू शकता. तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्याल, ती मला मान्य आहे. हा माझ्या स्वप्नांचा देश आहे. भारतात परत जायचे नाही."

आपल्या भावी पिढ्यांना पाकिस्तानात पाहण्याचे आपले स्वप्न असल्याचे हसनैन यांनी सांगितले. त्यांनी पाकिस्तानात उदरनिर्वाहासाठी नोकरीही मागितली.

हे भारतीय पिता-पुत्र दोघं पाकिस्तानात कसे पोहोचले आणि पाकिस्तान सरकारकडे कसा आश्रय मागत आहेत, यावर सध्या पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये खमंग चर्चा होत आहेत.

हसनैन यांनी पाकिस्तानमध्ये मीडियाशी बोलताना दावा केला की, ते आणि त्यांच्या मुलाने 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली सोडली आणि प्रथम यूएईला पोहोचले. तेथून या पिता-पुत्राने व्हिसासाठी अफगाणिस्तान दूतावासाशी संपर्क साधला. हसनैन यांनी असाही दावा केला की, पाकिस्तानात पोहोचल्यानंतर त्यांनी एका ट्रान्सपोर्टरला शहरात पोहोचण्यासाठी मदत केल्याबद्दल 60,000 रुपये दिले.

पाकिस्तानच्या एका पोलीस अधिकाऱ्याने देशातील एका राष्ट्रीय वृत्तपत्राला सांगितले होते की, त्यांना एधी निवारा गृहात तात्पुरता मुक्काम देण्यात आला आहे. इतर काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, असे दिसते की ते आश्रय घेण्यासाठी बेकायदेशीरपणे पाकिस्तानात घुसले आहेत. अधिकाऱ्यांनी हे बाप-लेक हेर असल्याची शक्यता फेटाळून लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

SCROLL FOR NEXT