Teacher arrested for telling Muslim student to beat Hindu classmate in Sambhal in Uttar Pradesh.
Teacher arrested for telling Muslim student to beat Hindu classmate in Sambhal in Uttar Pradesh.Dainik Gomantak

Viral Video: मुस्लिम विद्यार्थ्याला हिंदू वर्गमित्राला कानशीलात मारण्यास सांगणाऱ्या शिक्षिकेला अटक

ही घटना गुरुवारी (28 सप्टेंबर) घडली असून, सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये पीडित विद्यार्थी कॅमेऱ्यावर या घटनेबद्दल सांगत असल्याचे दिसून आले.
Published on

Teacher arrested for telling Muslim student to beat Hindu classmate in Sambhal in Uttar Pradesh:

उत्तर प्रदेशात एका धक्कादायक घटनेत, एका खाजगी शाळेतील शिक्षिकेने एका मुस्लिम विद्यार्थ्याला हिंदू वर्गमित्राने एका प्रश्नाचे अचूक उत्तर न दिल्याबद्दल "शिक्षा" म्हणून कानशीलात मारण्याचा आदेश दिला.

ही घटना गुरुवारी (28 सप्टेंबर) घडली आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये बालक कॅमेऱ्यावर या घटनेबद्दल बोलत असल्याचे दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी शाइस्ता नावाच्या आरोपी शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली, जिने वर्गातील मुस्लिम विद्यार्थ्याला हिंदू विद्यार्थ्याला कानशीलात मारण्याचा आदेश दिला होता.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 323 आणि 153-A (धर्माच्या आधारावर शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत असमोली पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदवली.

Teacher arrested for telling Muslim student to beat Hindu classmate in Sambhal in Uttar Pradesh.
Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराची आग मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत, एन बीरेन सिंग यांचे घर जाळण्याचा प्रयत्न

हा पीडित विद्यार्थी पाचवीतला असून, मुस्लिम विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या सांगण्यावरून हिंदू विद्यार्थ्याला कानशीलात मारली, असे पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले.

या घटनेमुळे आपल्या मुलाच्या भावना दुखावल्या गेल्याचे वडिलांनी सांगितले आणि शिक्षिकेवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात आरोपी शिक्षिकेला अटक केले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Teacher arrested for telling Muslim student to beat Hindu classmate in Sambhal in Uttar Pradesh.
NSE शी नाते जोडणाऱ्यांची संख्या वाढली, 8 महिन्यात सुरु झाली 1 कोटी नवी डिमॅट अकाउंट्स

या घटनेने मुझफ्फरनगर शाळेतील अशाच प्रकारची घटना पुन्हा डोळ्यासमोर आली. जिथे एका शिक्षिकेने वर्गातील हिंदू मुलांना मुस्लिम विद्यार्थ्याच्या कानशीला मारायला लावले होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com