The five-kg Ganesh laddu in Hyderabad was auctioned for a record-breaking Rs 1.25 crore:
हैदराबादचे मागील सर्व विक्रम मोडीत काढत, सन सिटीच्या रिचमंड विलाजमधील पाच किलोच्या गणेश लाडूचा तब्बल १.२५ कोटी रुपयांना 'लिलाव' करण्यात आला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत लिलावच्या रकमेत 100% वाढ झाली आहे. 2022 मध्ये राजेंद्रनगरमधील या उच्चस्तरीय गृहनिर्माण संस्थेतील लाडूला 60.8 लाख रुपये मिळाले होते.
लिलावादरम्यान, गणेश लाडू जिंकणाऱ्या मंडळाच्या सदस्यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी तीन तासांच्या मॅरेथॉन लिलावानंतर व्हिला रहिवाशांच्या एका गटाने अंतिम बोलीची रक्कम उभी केली गेली. या लिलावातून येणारा संपूर्ण पैसा सामाजिक कारणांसाठी वापरला जातो, असेही त्यांनी सांगितले.
"आर व्ही दिया चॅरिटेबल ट्रस्टच्या नेतृत्वाखाली 150 हून अधिक रहिवाशांनी या लिलावासाठी पैसे जमा केले होते. आता या पैशातून संकटात सापडलेल्या लोकांच्या विविध गटांना, वृद्धाश्रमात राहणारे वृद्ध आणि अनाथाश्रमातील मुलांना मदत केली जाईल," असे तेथिल रहिवाशांनी सांगितले.
या लिलावाचा उद्देश, दरवर्षी, परोपकारी कार्यास मदत करणे हा आहे. त्यांचे लक्ष मुख्यत्वे आरोग्यसेवा आणि शिक्षणावर केंद्रित आहे.
या गणेश प्रसाद लाडूच्या लिलावाची प्रथा सन सिटी येथे 2019 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी लाडूची अंतिम बोली 18.75 लाख रुपये लागली होती. तेव्हापासून, बोलीच्या रकमेत सतत वाढ होत आहे.
हा लिलाव दरवर्षी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला होतो आणि तेथिल लोक उदारपणे यामध्ये योगदान देतात. या लिलावातील लाडूचे नंतर सर्व व्हिला मालकांमध्ये प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.